मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी स्वीकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 15:57 IST2020-02-07T15:54:31+5:302020-02-07T15:57:35+5:30

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शासनाने हेमंत वसेकर यांची नियुक्ती केली होती. वसेकर यांनी बुधवारी सायंकाळी या पदाचा पदभार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याकडून स्वीकारला आहे.

Hemant Vasekar took over | मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी स्वीकारला पदभार

मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी स्वीकारला पदभार

ठळक मुद्देहेमंत वसेकर यांनी पदभार स्वीकारलाबिडिओ केडरचे अधिकारी

ओरोस : सिंधुदुर्गजिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शासनाने हेमंत वसेकर यांची नियुक्ती केली होती. वसेकर यांनी बुधवारी सायंकाळी या पदाचा पदभार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याकडून स्वीकारला आहे.

वसेकर हे वसुंधरा वॉटरशेड डेव्हलपमेंट, पुणे येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते. तेथून शासनाने त्यांची सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी या पदावर बढती झाल्यानंतर हे पद रिक्त होते. तोपर्यंत या पदाचा पदभार सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याकडे देण्यात आला होता.

नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर हे बिडिओ केडरचे अधिकारी आहेत. ते पुणे येथील वसुंधरा वॉटरशेड डेव्हलपमेंट विभागात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते.

तेथून शासनाने त्यांना बढती दिली असून सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती दिली आहे. येथे नियुक्ती झाल्यानंतर पुणे येथील त्यांच्या कार्यालयातून त्यांना मुक्त करण्यात आले नव्हते. त्यामुळे ते येथे हजर झाले नव्हते. बुधवारी सायंकाळी हजर होत त्यांनी आपल्या नव्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.

Web Title: Hemant Vasekar took over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.