शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पावसाने वैभववाडीत तारांबळ; आंबा, काजूचे नुकसान, बागायतदारांकडून नुकसानभरपाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:02 IST

विम्यासह शासनाने नुकसानभरपाई द्यावी

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे आठवडा बाजारातील फिरत्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. दरम्यान, सलग पडणाऱ्या पावसामुळे आंबा, काजू पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.वैभववाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये मंगळवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे प्रचंड उकाडा वाढला होता.दुपारी तीन वाजल्यापासून पावसाचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली. तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. वैभववाडीचा आठवडा बाजार असल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी रस्त्याकडेला आपली दुकाने थाटली होती.पावसाची रिपरिप सुरू होताच आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांची धावपळ झाली. अनेक व्यापाऱ्यांचा माल पावसात भिजून नुकसान झाले. शहरात अर्धा तास पाऊस सुरू होता. आंबा, काजू हंगाम बहरात असताना पाऊस झाल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. पावसामुळे या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

रात्री पुन्हा पाऊस कोसळलाबुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाल्यानंतर विजांचा कडकडाट झाला. त्यानंतर पुन्हा रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. जवळपास वीस मिनिटे मोठ्या सरी कोसळल्यामुळे उशिरापर्यंत वीजही गायब झाली होती.

विम्यासह शासनाने नुकसानभरपाई द्यावीवळवाच्या पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील आंबा पीक पूर्ण धोक्यात आले आहे. तर काजू पिकाचेही मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बागायतदारांना फळपीक विमा तसेच शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडीRainपाऊसFarmerशेतकरी