शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

Sindhudurg: वैभववाडी, कणकवलीत मुसळधार पावसाने दाणादाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 16:25 IST

बाजारपेठेत चिखल : खांबाळेत नारळाच्या झाडावर पडली वीज

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील बहुतांश गावांना बुधवारी (दि.१४) मुसळधार पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटांसह सुमारे तासभर झालेल्या पावसाने वैभववाडी बाजारपेठेत अक्षरशः दाणादाण उडवून दिली. दरम्यान, खांबाळे येथे घरानजीक असलेल्या नारळाच्या झाडांवर वीज पडली.वैभववाडी तालुक्याच्या विविध भागांत गेल्या गुरुवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी सकाळपासून काहीसे ढगाळ वातावरण होते, शिवाय प्रचंड उकाडा जाणवत होता. सकाळी अकरानंतर वाहने चालविणे मुश्कील झाले होते. दरम्यान, दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. या पावसामुळे सर्वांचीच ताराबंळ उडाली. जवळपास तासभर शहरात जोरदार पाऊस सुरू होता.तालुक्यातील वैभववाडी, एडगाव, सोनाळी, कुसूर उंबर्डे, वेंगसर, करुळ, कोकिसरे, खांबाळे, आचिर्णे, नावळे, सडुरे, कुर्ली या गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. खांबाळे येथील स्नेहलता प्रभाकर पवार यांच्या घरानजीक असलेल्या नारळाच्या झाडावर वीज कोसळली. त्यामध्ये नारळाच्या झाडाचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने इतर कोणतीही हानी झाली नाही.या पावसामुळे वैभववाडी शहरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले. आज आठवडा बाजारानिमित्त मोठी गर्दी होती. गटारांतील पाणी रस्त्यावर आल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. रस्त्यानजीक बसलेल्या व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

या भागात केवळ आठ ते दहा दिवसांचा हंगाम राहिला आहे, परंतु आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे आंबा बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

महामार्गाच्या कामामुळे वैभववाडी चिखलात!ऐन हंगामात वैभववाडी शहरातील संभाजी चौकातून जाणाऱ्या तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी कोकिसरे नारकरवाडीपासून अर्जुन रावराणे विद्यार्थ्यांपर्यंत रस्ता उखडून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ सर्वत्र चिखलच चिखल झाला असून, दुचाकीस्वार घसरून पडत आहेत.

कणकवली शहरात पावसाची हजेरीकणकवली शहरासह तालुक्यात बुधवारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वातावरणात  उष्णतेचे प्रमाण वाढलेले असतानाच पाऊस कोसळल्याने वातावरण काहीसे थंडगार झाले होते. मात्र, काही वेळाने पुन्हा वातावरणातील उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली. शहरात पावसाने हजेरी लावताच वीज प्रवाह खंडित झाला. पाऊण तासानंतर वीज प्रवाह सुरळीत झाला. त्यामुळे उष्णतेने नागरीक त्रस्त झाले होते. अचानक पावसाने हजेरी लावल्याने शहरातील विक्रेत्यांची धावपळ उडाली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडीKankavliकणकवलीRainपाऊस