शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

sindhudurg: कणकवली तालुक्यात पावसाचा जोर कायम!; जानवली, गडनदी पाणी पातळीत वाढ

By सुधीर राणे | Updated: July 22, 2023 13:22 IST

आचरा मार्गावर काही काळ पाणी, केटी बंधारे ओव्हर फ्लो!

कणकवली : कणकवली तालुक्यात काल, शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जानवली व गडनदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कणकवली ते आचरापर्यंत जाणाऱ्या  मार्गावर वरवडे येथे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. गडनदीवरील केटीबंधारे पाण्याखाली गेले असून मराठा मंडळ लगत असलेला केटी बंधाऱ्यावरून पाणी गेल्याने या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना प्रवास करणे कठीण झाले होते. कणकवली तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नदी-नाले तंडुब भरले आहेत. शुक्रवारी रात्री पावसाने घाटमाथ्यावर जोरदार हजेरी लावली. परिमाणी जानवली व गडनदीच्या पाण्यात वाढ झाली. जानवली नदीचे पाणी आचरा रस्त्यावर आल्याने हा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे सकाळच्या सत्रात मालवणकडे जाणाऱ्यांचे काहीसे हाल झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिल्यानंतर गुरुवार व शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र, शनिवारी सकाळीच आचरा मार्गावर पाणी आल्यामुळे यापरिसरात असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जाणे शक्य झाले नाही. नागरिकांनाही मागे फिरावे लागले. गडनदीवरील केटी बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत.कणकवली मराठा मंडळ नजीक असलेल्या केटीबंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले असून पाण्याच्या प्रवाहाने मोठे लाकडाचे ओंडके बंधाऱ्यात अडकून पडले आहेत. पाण्याचा प्रवाहामुळे ते बंधाऱ्याला आदळत असल्याने बंधारा कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे ओंडके काढून टाकण्याची मागणी होत आहे. दरम्यान, पाणी आलेल्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करत ते दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीRainपाऊसriverनदी