शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

लोटे औद्योगिक परिसराचे आरोग्य ढासळले

By admin | Updated: November 14, 2014 23:13 IST

तीन हजारांहून अधिक रुग्ण : वैद्यकीय सुरक्षेची हमी कोण घेणार?

आवाशी : लोटे परशुराम औद्योगिक वसाहत परिसरात समाविष्ट असणाऱ्या गावातील नागरिकांचे आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. दिवसभरात तीन हजारांहून अधिक रुग्ण वैद्यकीय उपचार घेत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सर्दी, खोकला, ताप यांसह श्वसन व त्वचेच्या आजाराचे अधिक रुग्ण असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.येथील औद्योगिक वसाहतीमध्ये परिसराचा विकास जितका झपाट्याने होत गेला तितक्याच वेगाने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दहा वर्षांपूर्वी चिपळूण येथील डी. बी. जे. महाविद्यालयात एका वैद्यकीय शिबिरांतर्गत झालेल्या चाचणीत गंभीर बाब उघड झाली होती व त्याचा परिणाम सर्वदूर पसरला. याबाबतीत ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी, सीईटीपी प्रदूषण मंडळ व औद्योगिक क्षेत्र अधिकाऱ्यांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. तेथे असणारी कारखानदारी पूर्णपणे रासायनिक स्वरुपाची आहे. जलप्रदूषणासह वायू प्रदूषणाचा परिणाम येथील मानवी वस्तीवर होतो. त्यामुळेच हे आजार होत असल्याचे पुढे येत आहे.लोटे औद्योगिक परिसरात रासायनिक क्षेत्र असल्याने तेथे रुग्णांना विविध प्रकारचे आजार होत असल्याचे एका चर्चासत्रात निष्पन्न झाले होते. त्यानंतर याबाबत आवश्यक ती काळजी घेण्यात आली नाही.अनेकांना श्वसनाच्या विकारासह त्वचेच्या आजाराने ग्रासले आहे. नुकताच या परिसरात डेंग्यूचा फैलाव झाल्याचे निदर्शनास आले. येथील वैद्यकीय सुत्रांकडून माहिती घेतली असता ही बाब उघड झाली. (वार्ताहर)महामार्गावरील लवेल, दाभीळ ते परशुराम या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्रासह २१ खासगी वैद्यकीय सेवा देणारे क्लिनिक आहेत. याठिकाणी उपचारासाठी अनेक रुग्ण येत असतात. या सर्व गाव परिसरात प्रत्येक खासगी वैद्यकीय अधिकाऱ्याकडे सुमारे १५० रुग्णांची तपासणी होत आहे.