शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

अवैध खनिज उत्खनन प्रकरणी न्यायालयात दाद मागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 3:40 PM

sand sindhudurg- सिंधुदुर्गात अवैध खनिज उत्खनन काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री , पर्यावरण मंत्री , राज्यपालांकडे आम्ही तक्रार केली आहे.संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणीही केली आहे.याबाबत दीड महिना वाट पाहून कारवाई न झाल्यास हरित लवाद अथवा उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे दिली.

ठळक मुद्दे अवैध खनिज उत्खनन प्रकरणी न्यायालयात दाद मागणारकारवाई न झाल्यास हरित लवाद अथवा उच्च न्यायालयात, परशुराम उपरकर यांचा इशारा

कणकवली : सिंधुदुर्गात अवैध खनिज उत्खनन काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री , पर्यावरण मंत्री , राज्यपालांकडे आम्ही तक्रार केली आहे.संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणीही केली आहे.याबाबत दीड महिना वाट पाहून कारवाई न झाल्यास हरित लवाद अथवा उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे दिली.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, कणकवली तालुक्यातील कासार्डे परिसरात अवैध सिलिका मायनिंग सुरू आहे. मात्र, दरमहा ५ लाख रुपये हफ्ता महसुल अधिकाऱ्यांना सिलिका माफिया देत आहेत. त्यामुळे महसूलच्या पथकांनी आमच्या जागेची मोजमापे घेतली तरी आमचे काही बिघडणार नाही. अशा बढाया अनधिकृतरित्या मायनिंग करणारे मारत आहेत.

जिल्ह्यात अनधिकृत खाणी , अवैध सिलिका मायनिंग , चोरट्या वाळूला काही महसूल मधील अधिकाऱ्यां वरदहस्त आहे. ते आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमताने शासकीय महसुलाचे नुकसान करीत आहेत . मागील दोन वर्षात १००हून अधिकजण राजरोस खुलेआम अवैध सिलिका उत्खनन करायला लागले आहेत .त्यामुळे मागील २ वर्षातील तळेरे मंडल अधिकारी व कासार्डे तलाठी यांच्या नावासह आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसेच आपण गुगल मॅप द्वारे सिलिका उत्खनन झालेली छायाचित्रे जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहेत. अनेक ठिकाणी केमिकलने वाळू धुतल्यानंतर ते पाणी नदीपात्रात सोडून अथवा जमिनीत मुरवुन पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे .याबाबत मुख्यमंत्री , पर्यावरण मंत्री , राज्यपालांकडे आम्ही तक्रार केली आहे . तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. मात्र , त्यांच्यावर कारवाई होत नाही. गोरगरीब जनतेने गावातील ओहोळातून वाळू किंवा माती काढली तरी तलाठी, मंडल अधिकारी त्यांना दमदाटी करतात . मात्र, तेच सरकारी अधिकारी सिलिका माफियांना सूट देतात. याला काय म्हणावे ?जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीतील पकडलेला डंपर पळवून नेऊनही त्याच्यावर कारवाई होत नाही . याला जबाबदार कोण ? उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून त्या डंपरचे रजिस्ट्रेशन रद्द का केले नाही ? असा सवालही उपरकर यांनी यावेळी उपस्थित केला .

टॅग्स :sandवाळूParshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग