शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

Hasan Mushriff : 'डोनाल्ड ट्रम्पपेक्षा लोकप्रिय माणूस फडणवीसांनी शोधून दाखवावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 18:12 IST

मंत्री हसन मुश्रीफ हे मंगळवारी कोल्हापूरहून गोव्याकडे जात असता सावंतवाडीत थांबले असता पत्रकारांशी संवाद साधला.

ठळक मुद्देरेमडीसीविर या इंजेक्शनवरून भाजपची काही मंडळी महाविकास आघाडी सरकारला बदनाम करत आहे. या इंजेक्शनचा साठा करून ठेवून तो भाजपच्या माध्यमातून वाटण्याचाच हा प्रयत्न होता. पण, तो महाविकास आघाडी सरकारने मोडीत काढला.

सावंतवाडी : अभिनेता सुशातसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणापासून आता रेमडीसीविर औषध पुरवठयावरून महाविकास आघाडी सरकाराला अस्थीर करण्याचा भाजपच्या कटाचा हा एक भाग असल्याचा आरोप राज्याचे ग्रामविकास तथा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. तसेच माझी लोकप्रियता एक महिलेशी करणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शोभते का असा सवालही त्यांनी उपस्थित करत डोनाल्ड ट्रम्पपेक्षा लोकप्रिय माणूस तरी शोधून काढावा असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.

मंत्री हसन मुश्रीफ हे मंगळवारी कोल्हापूरहून गोव्याकडे जात असता सावंतवाडीत थांबले असता पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, रेमडीसीविर या इंजेक्शनवरून भाजपची काही मंडळी महाविकास आघाडी सरकारला बदनाम करत आहे. या इंजेक्शनचा साठा करून ठेवून तो भाजपच्या माध्यमातून वाटण्याचाच हा प्रयत्न होता. पण, तो महाविकास आघाडी सरकारने मोडीत काढला. त्यामुळेच कुठलेही प्रकरण उकरून काढून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचे असाच कट भाजपने चालवल्याचे दिसून येते.मी केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांच्यावर जी टिका केली त्यावर आजही ठाम आहे. त्यांना गावात गेल्यावर पाच माणसे तरी ओळखतात का? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी माझी तुलना एका स्त्रीच्या लोकप्रियतेवर करणे योग्य नाही. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प पेक्षा लोकप्रिय माणूस शोधून काढला पाहिजे होता, असा सल्लाही यावेळी मुश्रीफ यांनी दिला.

राज्यात कडक लॉकडाउन करणे गरजेचे असून, कोरोनाची साखळी तुटली पाहिजे म्हणून सरकार खबरदारी घेत आहे. सरकारने कोरोना काळात मोठे पॅकेज दिले आहे. पण, जे घटक यातून राहिले आहेत, त्यांच्यासाठी ही सरकार काही तरी विचार करेल असे यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. येत्या काळात आक्सिजनचा मोठा साठा राज्याला लागणार आहे. रूग्णसंख्या वाढत आहे. मात्र, ऑक्सिजनचा साठा तयार करण्यासाठी योग्य ती पाऊले सरकारच्या माध्यमातून उचलली जात आहेत.           कोरोनाची तिसरी लाट येणारकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र कोरोनाची तिसरी लाट ही येणार आहे, असे तज्ञ सांगत असून सर्वांनी एकत्रपणे कोरोनाचा सामना करणे गरजेचे आहे. सरकार ही आपल्या माध्यमातून सर्व उपाययोजना करत असून, पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयानक आहे. मात्र, सरकार योग्य सामना करेल आता माणसे जगवणे हीच आमची प्राथमिकता असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcorona virusकोरोना वायरस बातम्याHasan Mushrifहसन मुश्रीफpiyush goyalपीयुष गोयल