शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

हंसराज गवळे यांच्या चित्रकलेचा दिल्लीत गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 17:30 IST

दिल्ली येथे आॅल इंडिया फाईन आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट सोसायटी गॅलरीत चित्र व शिल्प प्रदर्शन पार पडले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली क्र. ५चे उपक्रमशील तथा कलाप्रिय शिक्षक हंसराज गवळे यांच्या कलेची विशेष दखल या प्रदर्शनाद्वारे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.

ठळक मुद्देइन्सुली शाळेचे उपक्रमशील शिक्षक प्रदर्शनाद्वारे राष्ट्रीय स्तरावर घेतली दाखल

बांदा : दिल्ली येथे आॅल इंडिया फाईन आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट सोसायटी गॅलरीत चित्र व शिल्प प्रदर्शन पार पडले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली क्र. ५चे उपक्रमशील तथा कलाप्रिय शिक्षक हंसराज गवळे यांच्या कलेची विशेष दखल या प्रदर्शनाद्वारे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.या चित्र प्रदर्शनाचे उद््घाटन जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यु आॅफ युनिटीचे निर्माते शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांच्या हस्ते झाले. त्यांनी हंसराज गवळे यांच्या चित्र व शिल्पाचे विशेष कौतुक करताना अध्यापनाचे काम करता-करता इतक्या उंचीवरची चित्रकला निर्मिती केल्याबद्दल गौरवोद््गार काढले.गवळे यांनी या अगोदरही अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करून तालुका व जिल्ह्याच्या नावलौकिकात विशेष भर घातली आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार एस. बी. पोलाजी यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने आपले अध्यापनाचे काम सांभाळून मिळवलेले यश हे नक्कीच उल्लेखनीय असल्याने शिक्षण विभागातून त्यांचे अभिनंदन होत आहे. तसेच विस्तार अधिकारी दुर्वा साळगांवकर व केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर व मुख्याध्यापक धनंजय केरकर यांनी अभिनंदन केले आहे.दगडासोबतच लाकडापासून बनविल्या कलाकृतीहंसराज गवळे यांनी या चित्र व शिल्प प्रदर्शनात दगडासोबतच लाकडापासून बनविलेल्या कलाकृती मांडल्या आहेत. त्याबद्दल माहिती देताना ते म्हणाले, जंगलात पडलेल्या लाकडांवरील नैसर्गिक आकृत्यांचा वापर करून मी कलाकृती घडवितो. काही वेळा त्यातील नैसर्गिक आकृत्या वापरतो, तर काहीवेळा त्यात भर घालावी लागते. प्रदर्शनात त्यांची मांडणी करताना विशिष्ट थीम सादर केली आहे. 

टॅग्स :artकलाsindhudurgसिंधुदुर्ग