देवली येथे दहा अनधिकृत रॅम्पवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:37 IST2019-05-31T18:35:59+5:302019-05-31T18:37:42+5:30
देवली येथे अनधिकृत उत्खनन करणाऱ्या दहा रॅम्पवर खनिकर्म विभागाने अखेर कारवाईचा ह्यहातोडाह्ण मारत ते रॅम्प बुधवारी सकाळी जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले. तत्पूर्वी मंगळवारी रात्री तेथून रेती वाहतूक करणारे तीन डंपर खनिकर्म विभागाने पकडून महसूलच्या ताब्यात दिले होते. दरम्यान, संबंधित डंपरच्या मालकांना महसूल प्रशासनाच्यावतीने कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

देवली येथे दहा अनधिकृत रॅम्पवर हातोडा
मालवण : देवली येथे अनधिकृत उत्खनन करणाऱ्या दहा रॅम्पवर खनिकर्म विभागाने अखेर कारवाईचा ह्यहातोडाह्ण मारत ते रॅम्प बुधवारी सकाळी जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले. तत्पूर्वी मंगळवारी रात्री तेथून रेती वाहतूक करणारे तीन डंपर खनिकर्म विभागाने पकडून महसूलच्या ताब्यात दिले होते. दरम्यान, संबंधित डंपरच्या मालकांना महसूल प्रशासनाच्यावतीने कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
देवली पट्ट्यात अनधिकृतरित्या वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आल्याने बुधवारी सकाळी जिल्हा खनिकर्म विभागाचे दिवेकर, मंडळ अधिकारी मंगेश तपकीरकर, तलाठी डी. सी. ठाकूर यांच्या पथकाने देवली येथे अचानक छापा टाकला.
यावेळी सचिन रेवंडकर यांच्या मालकीचा डंपर (क्रमांक एम. एच. ०७ जी- ७०१७), महेश शिरसाट यांच्या मालकीचा डंपर (क्रमांक एम. एच. ०७ एक्स- ०३३१), मेहबूब अली वालीकर यांच्या मालकीचा डंपर (क्रमांक जीए. ०२ टी-८३८० हे डंपर अनधिकृतरित्या आढळले होते.