शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

विश्वविक्रम! गुरुप्रसाद मोरेने सिंधुदुर्ग ते विजयदुर्ग समुद्राला १९ तासांत घातली गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 16:42 IST

वयाच्या १४ व्या वर्षात परफेक्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पोहण्याच्या विक्रमाची नोंद व्हावी हे त्याचे स्वप्न होते. ते त्याने पूर्ण केले.

देवगड: सिंधुदुर्ग किल्ला ते विजयदुर्ग किल्ला असा समुद्रातून पोहत जाण्याचा विश्वविक्रम कोल्हापूर शाहूपुरी येथील गुरुप्रसाद मोरे ( वय १४ ) याने केला आहे. त्याने तब्बल १९ तास २३ मिनिटे वेळात ९७ किलोमीटर अंतर पार केले.या त्याच्या कौतुकाबद्दल देवगड पंचायत समिती सभापती रवी पाळेकर, महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण सचिव राजेंद्र पालकर , अजय पाठक , बाबा परब यांच्या उपस्थितीमध्ये त्याचा सत्कार करण्यात आला.गुरुप्रसाद मोरे याने एकट्याने मालवण येथून २३ रोजी रात्री नऊ वाजता समुद्रामधून पोहण्यास सुरुवात केली . रात्रभर न थांबता हा प्रवास करत गुरुवार २४ रोजी विजयदुर्ग येथे दुपारी ४.२३ वाजता तो पोहोचला. यावेळी त्याला पोहताना प्रोत्साहन मिळावे म्हणून शिवतेज पवार, यशवर्धन मोहिते, अथर्व माळी, ओंकार म्हाकवे, योगेश केतवडे या सर्वांनी त्याच्या सोबत थोडे अंतर पोहत त्याला साथ दिली.त्याच्यासोबत एका बोटीतून प्रशिक्षक नीळकंठ आखाडे , अजय पाठक व त्याचे वडील हे होते. या त्याच्या यशाबद्दल विजयदुर्ग येथे पंचायत समिती सभापती रवी पाळेकर, विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, उपसरपंच महेश बिडये, राजीव परुळेकर, रविकांत राणे, सुप्रिया आळवे संदीप डोळकर यांनी स्वागत केले.वयाच्या १४ व्या वर्षात परफेक्ट बुक ऑफ वर्ल्ड  रेकॉर्डमध्ये पोहण्याच्या विक्रमाची नोंद व्हावी हे त्याचे स्वप्न होते. ते त्याने पूर्ण केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरSwimmingपोहणे