मच्छिमारांची वैभव नाईकांप्रति कृतज्ञता, मालवणात सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 16:21 IST2021-03-12T16:19:42+5:302021-03-12T16:21:39+5:30
Vaibhav Naik fisherman sindhudurg- मच्छिमारांना जाहीर झालेल्या मत्स्य पॅकेजमधील जाचक अटी शिथिल करण्यात आल्या. यात आमदार वैभव नाईक यांनी महत्त्वाची भूमिका बजावत मच्छिमारांना न्याय दिल्याने मालवण येथे मच्छिमारांच्यावतीने आमदार नाईक यांचे आभार मानत सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मत्स्य विकासमंत्री अस्लम शेख यांचेही मच्छिमारांनी विशेष आभार मानले आहेत.

मच्छिमारांची वैभव नाईकांप्रति कृतज्ञता, मालवणात सत्कार
मालवण : मच्छिमारांना जाहीर झालेल्या मत्स्य पॅकेजमधील जाचक अटी शिथिल करण्यात आल्या. यात आमदार वैभव नाईक यांनी महत्त्वाची भूमिका बजावत मच्छिमारांना न्याय दिल्याने मालवण येथे मच्छिमारांच्यावतीने आमदार नाईक यांचे आभार मानत सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मत्स्य विकासमंत्री अस्लम शेख यांचेही मच्छिमारांनी विशेष आभार मानले आहेत.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत, पंकज सादये, सेजल परब, संमेश परब, किरण वाळके, नरेश हुले, तपस्वी मयेकर, भाई कासवकर, बाळू नाटेकर, दीपा शिंदे, स्वप्नील आचरेकर, संतोष खंदारे यांसह अन्य उपस्थित होते.
जास्तीत जास्त जणांना मिळणार लाभ
मत्स्य विक्रेत्या महिला, मच्छिमार व्यावसायिक, ट्रॉलर मालक संघटना मालवण यांच्यावतीने हा सत्कार करण्यात आला. शिधापत्रिकेनुसार एक सभासद लाभ ही अट राज्य शासनाने शिथिल केल्याने जास्तीत जास्त जणांना लाभ मिळणार
आहे. याबाबत ट्रॉलर मालक संघटना अध्यक्ष विकी चोपडेकर यांनीही आभार मानले.