शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छतेसाठी जाणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही मोजावे लागतात पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 12:18 PM

सिंधुदुर्ग किल्ल्यावर होडीने जाण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकातील उल्लेख केलेल्या व्यक्तींनाच विनामूल्य प्रवास

मालवण: सिंधुदुर्ग किल्ल्यावर अभ्यागत कर आणि स्वच्छतेसाठी जाणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही आता किल्ल्यात नौकेने जाण्यासाठीचे पैसे मोजावे लागणार आहेत. मेरीटाईम बोर्डाच्या बंदर निरीक्षकांशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर ५ कर्मचारी वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीने नियुक्त केले असून या कर्मचाऱ्यांच्या तिकिटांचा भुर्दंड आता ग्रामपंचायतीला सहन करावा लागणार आहे. दरम्यान सिंधुदुर्ग किल्ला वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे मेरीटाईम बोर्डाच्या या भूमिकेवर वायरी भूतनाथ ग्रामपंचायत काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर अभ्यागत कर जमा करण्यासाठी चार महिला कर्मचारी तर एक सफाई कामगार वायरी भूतनाथ ग्रामपंचायतिने नियुक्त केले आहेत. किल्ल्यावर जायचे असल्यास मेरीटाईम बोर्डाच्या अखत्यारीत असलेल्या किल्ले प्रवासी होडी वाहतुकीची तिकीट काढून होडीने किल्ल्यावर जाता येते. यासाठी प्रौढांना १०० तर  लहान मुलांना ५० रुपये असे तिकिटाचे दर आहेत. अंध, अपंग, मूकबधिर, कार्यालयीन कामकाजासाठी जाणारे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच  सिंधुदुर्ग किल्ला रहिवासी, विद्यार्थी यांना ही सेवा विनामूल्य असल्याचा हुकूमनामा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून जाहीर करण्यात आला आहे. तशा आशयाचा फलक मालवण येथील बंदर जेटीवर मेरीटाईम बोर्डाकडून लावण्यात आला आहेयोग्य ती कार्यवाही केली जाईलवायरी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एस. डी. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता या बाबत आमच्याशी मेरीटाईम बोर्डाने कोणताही पत्रव्यवहार केलेला नसल्याचे सांगितले. सिंधुदुर्ग किल्ला हा आमच्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे स्थानिक प्राधिकरणाला विश्वासात घेऊन मेरीटाईम बोर्डाने निर्णय घ्यायला हवा होता. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ग्रामपंचायतीने स्वच्छता आणि अभ्यागत कर जमा करण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत. भविष्यात या कर्मचाऱ्यांना किल्ला प्रवासी होडी वाहतुक करण्यास अटकाव करण्यात आल्यास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कार्यवाही केली जाईल.तर तिकिटात सवलत देऊ - अरविंद परदेशीसिंधुदुर्ग किल्ल्यावर होडीने जाण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकातील उल्लेख केलेल्या व्यक्तींनाच विनामूल्य प्रवास करता येईल. सदरील कर्मचारी सिंधुदुर्ग किल्ला रहिवाशी नसल्यास त्यांना तिकीट काढूनच किल्यात जावे लागेल. मात्र ग्रामपंचायतीने आमच्याशी पत्रव्यवहार केल्यास आम्ही त्यांना तिकिटात सवलत देऊ शकतो असे सहाय्यक बंदर निरीक्षक अरविंद परदेशी यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFortगडgram panchayatग्राम पंचायत