शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मालवणमधून मला ५० हजार मते द्या, नारायण राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 18:59 IST

गेल्या पाच वर्षांत आमदार, खासदार, पालकमंत्री आपले नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याची अधोगती झाली. लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला तरी जिल्ह्यात आमची ताकद जास्त आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मला मालवण तालुक्यातून ५० हजार मते मिळाली पाहिजेत. यावेळी मला संधी दिली नाही तर जिल्हा अजून मागासलेला होईल, अशी भीती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमालवणमधून मला ५० हजार मते द्या, नारायण राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन तुमच्या अडीअडचणीला धावून येणारा उमेदवार देणार

मालवण : गेल्या पाच वर्षांत आमदार, खासदार, पालकमंत्री आपले नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याची अधोगती झाली. लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला तरी जिल्ह्यात आमची ताकद जास्त आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मला मालवण तालुक्यातून ५० हजार मते मिळाली पाहिजेत. यावेळी मला संधी दिली नाही तर जिल्हा अजून मागासलेला होईल, अशी भीती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली.मालवण येथील दैवज्ञ भवन येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यकारिणीची बैठक खासदार राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सभापती सोनाली कोदे, बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस, जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर, सरोज परब, कृष्णनाथ तांडेल, सुहास हडकर, राजन सरमळकर, अशोक तोडणकर, अशोक बागवे, महेश जावकर, लीलाधर पराडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.राणे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून मी यशस्वी झालो. मात्र, सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलो तरी यशस्वी होऊ शकलो नाही, ही दु:खाची बाब आहे. मागील निवडणुकीत वैभव नाईक यांनी केलेला पराभव मी विसरू शकत नाही. १९९० पासून मला ८० टक्केच्यावर मताधिक्य मिळायचे. मात्र, लोकसभा निवडणुकीत मताधिक्याची टक्केवारी घसरली असून महिन्याभरात सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

मतांची टक्केवारी ८० टक्के एवढी व्हायला पाहिजे. कुडाळ-मालवणमध्ये कोणता उमेदवार द्यायचा हे मी जाहीर करणार आहे. तुमच्या अडीअडचणीला धावून येईल, असा उमेदवार देईन. त्यामुळे गटातटाचे राजकारण न करता गावागावात जाऊन एकदिलाने पक्षहितासाठी काम करा. निवडणुकीआधी प्रत्येक पंचायत समिती मतदारसंघात मी भेट देईन.पाच वर्षांत जिल्ह्यातील मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांची वाताहात झाली. जिल्ह्याचे अर्थकारण बदलण्याची क्षमता असलेले प्रकल्प मी आणले. मात्र, तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी ते प्रकल्प बंद केले. येथील तरुणांच्या हाताला काम मिळेल असा एकही प्रकल्प आणू शकले नाहीत.

सी-वर्ल्डमुळे मालवणचे नव्हे तर जिल्ह्याचे रुप बदलणार होते, मात्र त्यालाही या लोकांनी विरोध केल्याने जिल्हा मागासलेला राहिला आहे. मी आमदार, मंत्री म्हणून कमी पडलो का? आपल्या मतदारसंघात हक्काचा आमदार, खासदार तसेच पालकमंत्री नसल्याने अधोगती सुरू आहे, असा टोलाही राणेंनी सत्ताधाऱ्यांना हाणला.यावेळी सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपोषण आंदोलनाला राणेंनी पाठिंबा दिला. जिल्ह्याला विकासनिधी कमी पडू देणार नाही. कार्यकर्त्यांनी माझ्याकडे विकासकामे आणावीत. प्रत्येकाला न्याय देण्याचे काम मी करेन, असेही राणे यांनी सांगितले. स्वाभिमान पक्षाच्यावतीने जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यात येणार आहे. त्याबाबत पक्षाकडून नियोजन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग