शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अज्ञात वाहनाच्या धडकेत गवा ठार, मुंबई-गोवा महामार्गावर ओरसगाव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 13:00 IST

अपघातानंतर वाहनासह चालकाने पलायन केले.  

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत गवा ठार झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री १२.१५ वाजण्याचा सुमारास ओसरगाव गवळीवाडी येथील आंबेरकर दुकानासमोर घडली. अपघातानंतर वाहनासह चालकाने पलायन केले.     महामार्गावर मृतावस्थेत पडलेल्या गव्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती सामजिक कार्यकर्ते बबली राणे व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तत्काळ त्यांनी वनविभागाचे अधिकारी व वाहतूक पोलिसांना कळविले. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने रस्त्यावर मृतावस्थेत पडलेल्या गव्याला बाजूला करत खोळंबलेली वाहतूक पूर्ववत केली.त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने मृत गव्याला उचलून ट्रॅक्टरमध्ये भरून विल्हेवाट लावण्यासाठी दिगवळेत नेले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बबली राणे, अक्षय राणे, नितीन धुरी, चेतन राणे, सूरज कदम, हेमंत आंगणे, सुनील राणे आदी स्थानिक ग्रामस्थानी मदत कार्य केले.अज्ञातावर गुन्हा दाखल!अज्ञातावर वनकायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळताच उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, सहाय्यक उपवनसंरक्षक अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांनी आपले सहकारी वनपाल तानाजी दळवी, वनपाल सारीक फकीर तसेच वनरक्षकांसोबत तत्काळ घटनास्थळी जात मृत गव्याची पाहणी केली. घटनेचा पंचनामा करत मृत गवा  दिगवळे येथील शासकीय रोपवाटिकेत आणण्यात आला. यावेळी वनरक्षक दळवी, शिंदे, राठोड, गावकर, वनमजुर शिर्के आदी उपस्थित होते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन केल्यानंतर मृत गव्याचे दहन करण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग