Sindhudurg: हिवाळेत विहिरीत पडला गवा, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 3, 2023 18:23 IST2023-08-03T18:21:43+5:302023-08-03T18:23:11+5:30

मालवण : तालुक्यातील हिवाळे गवळवाडी येथील प्रदिप परब (मसुरकर) याच्या विहिरीत गवा पडल्याचे निदर्शनास आले. याची माहिती वन विभागाला ...

gaur fell in a well in hivale, forest department officials rushed to the spot | Sindhudurg: हिवाळेत विहिरीत पडला गवा, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल

Sindhudurg: हिवाळेत विहिरीत पडला गवा, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल

मालवण : तालुक्यातील हिवाळे गवळवाडी येथील प्रदिप परब (मसुरकर) याच्या विहिरीत गवा पडल्याचे निदर्शनास आले. याची माहिती वन विभागाला देण्यात आली असून वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

आज, गुरूवारी सकाळी या परिसरात चारा कापण्यासाठी आलेल्या समिर पालव यांना गवा विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती पोलिस पाटील विरेन कदम यांनी वन अधिकाऱ्यांना दिली आहे. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गव्याला विहिरीतून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. डोंगर भागात झाडे आणि वेली यांनी ही विहीर आच्छादलेली आहे.

Web Title: gaur fell in a well in hivale, forest department officials rushed to the spot