वरवडे येथे शेतकऱ्यांवर गांधीलमाशांचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 17:32 IST2019-11-02T17:30:04+5:302019-11-02T17:32:50+5:30
कणकवली तालुक्यातील वरवडे येथे शेतीचे काम करत असताना काही शेतकऱ्यांवर गांधीलमाशांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे ते शेतकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कणकवली येथील रुग्णालयांत उपचार करण्यात आले.

वरवडे येथे शेतकऱ्यांवर गांधीलमाशांचा हल्ला
कणकवली : कणकवली तालुक्यातील वरवडे येथे शेतीचे काम करत असताना काही शेतकऱ्यांवर गांधीलमाशांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे ते शेतकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कणकवली येथील रुग्णालयांत उपचार करण्यात आले.
वरवडे येथे शेतीचे काम करीत असताना काही शेतकऱ्यांवर शुक्रवारी दुपारी गांधीलमाशांनी हल्ला चढविला. कामात दंग असलेल्या शेतकऱ्यांवर या माशांनी अचानक हल्ला केल्याने त्यांचा गोंधळ उडाला.
या गांधीलमाशांपासून आपले रक्षण करण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी तेथून पळ काढला. मात्र, तरीही त्यांची पाठ त्या माशांनी सोडली नाही. थोड्या वेळाने कशी तरी आपली सुटका करून घेण्यात त्या शेतकऱ्यांना यश आले.
त्यानंतर या घटनेची माहिती समजताच शेजाऱ्यांनी जखमी झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, या शेतकऱ्यांची नावे समजू शकली नाहीत. या घटनेमुळे ग्रामस्थांच्या तसेच शेतकऱ्यांच्या मनात वेगळेच दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .