गडनदीला पूर; मसुरे सह बांदिवडे गावचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 11:57 IST2021-07-19T11:56:13+5:302021-07-19T11:57:28+5:30
Flood Malvan Sindhudurg : धो धो बरसणाऱ्या पावसाने रविवारी सायंकाळ नंतर गडनदीला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडनदी पात्रातील खोत जुवा, मसुरकर जुवा या बेटावरील ग्रामस्थांच्या घरा सभोवताली पुराचे पाणी आल्याने ग्रामस्थांनी जीव मुठीत घेऊन रात्र काढली. बेटावरील अनिल खोत यांच्या रिसॉर्टचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले आहे तर पराग खोत यांच्या घराच्या पडवीत पाण्याने प्रवेश केला आहे.

गडनदीला पूर; मसुरे सह बांदिवडे गावचा संपर्क तुटला
मालवण : धो धो बरसणाऱ्या पावसाने रविवारी सायंकाळ नंतर गडनदीला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडनदी पात्रातील खोत जुवा, मसुरकर जुवा या बेटावरील ग्रामस्थांच्या घरा सभोवताली पुराचे पाणी आल्याने ग्रामस्थांनी जीव मुठीत घेऊन रात्र काढली. बेटावरील अनिल खोत यांच्या रिसॉर्टचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले आहे तर पराग खोत यांच्या घराच्या पडवीत पाण्याने प्रवेश केला आहे.
रात्री वाढलेला पाण्याचा जोर सोमवारी काहीसा कमी झाला असला तरी मसुरेचा रस्ता मार्गे संपर्क पुन्हा एकदा तुटला आहे. गडनदी पात्रा बाहेर वाहत असल्याने मसुरे कावावाडी, टोकळवाडी, उसलाटवाडी यासह बांदिवडे, सय्यदजुवा, भगवंतगड या भागातील घरांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पुराच्या पाण्याचा जोर रात्री वाढल्याने बांदिवडे मळावाडी भागातील ग्रामस्थांनी आपली गुरे तसेच वाहने बांदिवडे पुलाच्या जोड रस्त्यावर आणून लावली आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुराचे पाणी ग्रामस्थांच्या घरात घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.