कणकवली नगरपंचायतीच्या चार विषय समित्या गठित, तीन सभापती पदे रिक्त, कणकवली न.पं.मधील स्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 09:42 PM2017-10-06T21:42:33+5:302017-10-06T21:42:57+5:30

कणकवली नगरपंचायतीच्या चार विषय समित्या निवड प्रक्रिये दरम्यान गठित झाल्या आहेत. मात्र, राणे समर्थक नगरसेवकांनी या निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याने  बाजार व पाणी पुरवठा समिती वगळता अन्य तिन समिती सभापतींची निवड होऊ शकलेली नाही. 

Four Sub-committee committees of Kankali Nagar Panchayat formed, three posts vacant, position in Kankavali NP. | कणकवली नगरपंचायतीच्या चार विषय समित्या गठित, तीन सभापती पदे रिक्त, कणकवली न.पं.मधील स्थिती 

कणकवली नगरपंचायतीच्या चार विषय समित्या गठित, तीन सभापती पदे रिक्त, कणकवली न.पं.मधील स्थिती 

googlenewsNext

कणकवली - कणकवली नगरपंचायतीच्या चार विषय समित्या निवड प्रक्रिये दरम्यान गठित झाल्या आहेत. मात्र, राणे समर्थक नगरसेवकांनी या निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याने  बाजार व पाणी पुरवठा समिती वगळता अन्य तिन समिती सभापतींची निवड होऊ शकलेली नाही. 
  कणकवली नगरपंचायतीच्या विषय समिती सदस्यांची निवड करण्याबरोबरच सभापती निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी कार्यक्रम जाहिर केला होता. त्यानुसार शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
     येथील नगरपंचायतीच्या प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात शुक्रवारी पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी नीता शिंदे यांच्या उपस्थितीत ही सभा झाली. यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावड़े उपस्थित होते. नगराध्यक्षा माधुरी गायकवाड़, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक रूपेश नार्वेकर, सुशांत नाईक, सुमेधा अंधारी, राजश्री धुमाळे, नंदिनी धुमाळे, स्वीकृत नगरसेवक  दिवाकर मुरकर यावेळी उपस्थित होते.
 निवड प्रक्रिया कार्यक्रमानुसार पीठासीन अधिकाऱ्यांनी सकाळी 11 वाजता प्रक्रिया सुरु केली. यावेळी राणे समर्थक स्वीकृत नगरसेवक सुरेंद्र उर्फ़ अण्णा कोदे यांनी आपल्यासह नऊ राणे समर्थक नगरसेवक या प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे पत्र पीठासीन अधिकाऱ्याना दिले तसेच सभागृहातून प्रस्थान केले. त्यानंतर नियमानुसार निवड प्रक्रीया राबविण्यात आली.
    कणकवली नगरपंचायतीत शिवसेना व भाजपच्या चार नगरसेवकांचा अधिकृत गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाच्या नेत्या म्हणून राजश्री धुमाळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे गटनेत्या धुमाळे यांनी विविध  चार समित्यांमध्ये आपल्या गटातील प्रत्येकी एका नगरसेवकाचा सहभाग करावा असे पत्र पीठासीन अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार त्या चार सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये महिला बालकल्याण समिती मध्ये स्नेहा नाईक, सार्वजनिक बांधकाम समितीमध्ये राजश्री धुमाळे, आरोग्य व शिक्षण समितीमध्ये सुशांत नाईक तर बाजार व पाणी पुरवठा समितीत नंदिनी धुमाळे यांचा समावेश करण्यात आला .
तर राणे समर्थक नगरसेवक गटातील सदस्य अनुपस्थित असले तरी ते नगरपंचायतीचे सदस्य असल्याने त्यांच्यासह उर्वरित अकरा नगरसेवकांमधुन चिठ्ठी द्वारे अन्य समिती सदस्यांची निवड करण्यात आली. छोट्या मुलानी चिठ्ठी उचलून समिती सदस्य पदासाठी नगरसेवकांची निवड केली.  माजी नगराध्यक्षा अड़. प्रज्ञा खोत या अपात्र ठरल्याने सध्या नगरपंचायतीत 16 नगरसेवक कार्यरत आहेत. तर 2 स्वीकृत नगरसेवक आहेत. मात्र ,या स्वीकृत नगरसेवकाना निवडणुकीवेळी मतदानाचा अधिकार नसल्याने आपले मत देता येत नाही. 

 चार विषय समित्या गठित 
नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समिती सदस्यपदी --स्नेहा नाईक, सुविधा साटम, सुमेधा अंधारी, मेघा गांगण.
बांधकाम समिती सदस्यपदी- राजश्री धुमाळे, समीर नलावडे, सुमेधा अंधारी, अभिजीत मुसळे, गौतम खुडकर.
  आरोग्य व शिक्षण समिती सदस्यपदी --सुशांत नाईक, कन्हैया पारकर, समीर नलावडे, राधाकृष्ण नार्वेकर, माया सांब्रेकर. 
बाजार , पाणी पुरवठा समिती सदस्यपदी- कन्हैया पारकर, सुमेधा अंधारी, नंदिनी धुमाळे, किशोर राणे, माया सांब्रेकर यांची निवड झाली आहे.

 तीन सभापती पदे रिक्तच ! 
बाजार व पाणी पुरवठा समितीचे पदसिध्द सभापती उपनगराध्यक्ष असतात त्यामुळे कन्हैया पारकर यांची निवड झाली आहे. मात्र, सभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करताना उमेदवाराला सूचक व अनुमोदकाची गरज असते. राणे समर्थक नगरसेवकांनी या निवड प्रक्रियेवर बहिष्कार घातल्याने महिला व बालकल्याण समिती , बांधकाम समिती, शिक्षण व आरोग्य समिती सभापतीपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल होऊ शकली नाहीत. त्यामुळे या समितींची सभापती पदे रिक्त राहिली आहेत.

Web Title: Four Sub-committee committees of Kankali Nagar Panchayat formed, three posts vacant, position in Kankavali NP.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.