शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

Sindhudurg: वर्षा पर्यटनावरून परतताना काळाचा घाला, एसटी-रिक्षाच्या धडकेत चार रिक्षा व्यावसायिक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 14:09 IST

एक जण गंभीर जखमी, आचरा गावावर शोककळा

देवगड : तालुक्यातील नारिंग्रे कोटकामते मार्गावर नारिंग्रे स्मशानभूमीनजीक एसटीला रिक्षाची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रिक्षामधील आचरा (ता.मालवण) येथील चार रिक्षा व्यावसायिक ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये रिक्षा चालक संकेत सदानंद घाडी (३५, रा.आचरा वरचीवाडी), संतोष रामजी गावकर (३५, आचरा गाऊडवाडी), रोहन मोहन नाईक (३५, आचरा गाऊडवाडी) आणि सुनील उर्फ सोनू कोळंबकर (४२, आचरा पिरावाडी) यांचा समावेश आहे. गंभीर जखमी रघुनाथ रामदास बिनसाळे (४५, रा.आचरा भंडारवाडी) याला गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.हा अपघात शुक्रवारी दुपारी ३:४५ वाजण्याच्या सुमारास घडला. हे सर्व जण वर्षा पर्यटनासाठी देवगड तालुक्यात आले होते. पर्यटन आटोपून हे पाच जण आचरा येथे आले आणि पुन्हा देवगडकडे जात असताना यातील चौघांवर काळाने घाला घातला.आचरा येथील रिक्षा चालक संकेत घाडी याच्यासमवेत तेथील संतोष गावकर, रोहन नाईक, सोनू कोळंबकर, रघुनाथ बिनसाळे हे आपल्या इतर मित्रांसमवेत रिक्षाने देवगड तालुक्यात वर्षा पर्यटनासाठी आले होते. देवगड आगारातून दुपारी अडीच वाजता सुटलेली विजयदुर्ग मालवण ही एसटी नारिंग्रे-कोटकामते मार्गावरून मालवणच्या दिशेने जात होती. या एसटीवर चालक संदीप अनंत माळगावकर तर वाहक म्हणून डी.एम. भेले हे सेवा बजावत होते. दुपारी ३:४५ वाजण्याच्या सुमारास संकेत घाडी यांची रिक्षा नारिंग्रे स्मशानभूमीनजीक चढ-उताराच्या वळणावर अचानक समोर आलेल्या विजयदुर्ग-मालवण या एसटीला बाजू देताना संकेत घाडी यांचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा पलटी होऊन एसटीला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, रिक्षातील चालक संकेत घाडी, संतोष गावकर, सोनू कोळंबकर हे जागीच ठार झाले, तर रोहन नाईक व रघुनाथ बिनसाळे हे गंभीर जखमी झाले होते.या अपघाताचे वृत्त परिसरात पसरताच, स्थानिक ग्रामस्थांसह मिठबांव सरपंच भाई नरे, शैलेश लोके, काका नरे यांच्यासह मिठबांव ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले. यातील गंभीर जखमी रोहन नाईक आणि रघुनाथ बिनसाळे यांना रामेश्वर प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेने तत्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, यातील गंभीर जखमी असलेला रोहन नाईक याचा वाटेतच मृत्यू झाला, तर रघुनाथ बिनसाळे याच्यावर देवगड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून, अधिक उपचारासाठी त्याला गोवा बांबुळी येथे नेण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच, देवगड पोलिस निरीक्षक भरत धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पोलिस हवालदार आशिष कदम, प्रवीण सावंत, नीलेश पाटील, स्वप्निल ठोंबरे, योगेश महाले, नितीन डोईफोडे, गणपती गावडे आदींनी घटनास्थळी जात पंचनामा केला. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी मिठबांव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यावेळी तेथे आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, शिंदेसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे यांच्यासह सुमारे २०० हून अधिक आचरा ग्रामस्थ, रिक्षा व्यावसायिक, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.काळीज पिळवटून टाकणारा आक्रोशअपघातात मृत झालेल्यांचे नातेवाईक मिठबांव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले आणि यावेळी त्यांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. मृत रोहन गावकर यांचा तीन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. सोनू कोळंबकर याला दोन मुली असून, संकेत घाडी यांनी पंधरा दिवसांपूर्वीच आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता....आणि काळाचा घालाआचरा येथील सुमारे १५ रिक्षा व्यावसायिक समूहाने देवगड तालुक्यात वर्षा पर्यटनासाठी आले होते. मसवी येथे त्यांनी एकत्रित स्नेहभोजन करून आचरा येथे सर्वांनी परतीचा प्रवास सुरू केला. मात्र, संकेत घाडी आणि त्याच्यासोबत संतोष गावकर, रोहन नाईक, सोनू कोळंबकर, रघुनाथ बिनसाळे हे आचरा येथे पोहोचताच, पुन्हा देवगडच्या दिशेने माघारी आले आणि त्यांच्यावर काळाने घाला घातला.