शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कलमठ बिडयेवाडी येथे चार बंद बंगले फोडले; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपास; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद

By सुधीर राणे | Updated: June 4, 2025 13:17 IST

कणकवली : कणकवली शहरालगत कलमठ बिडयेवाडी येथील चार बंद बंगले फोडत चोरट्याने दागिने तसेच रोख रक्कम असा पावणेदोन लाखांचा ...

कणकवली: कणकवली शहरालगत कलमठ बिडयेवाडी येथील चार बंद बंगले फोडत चोरट्याने दागिने तसेच रोख रक्कम असा पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. सोमवारी (दि.२) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. तर एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरीच्या घटनेमुळे कणकवली परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांसमोर चोरट्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.कलमठ, बिडयेवाडी येथील संजय सुभाष सावंत यांचा बंद बंगला चोरट्याने फोडला आहे. संजय सावंत यांचा मुलगा अद्वैत हा पुणे येथे शिक्षणासाठी असतो. त्याला सोडण्यासाठी ते पुण्याला गेले होते. हीच संधी साधत चोरट्याने बंद बंगला फोडला. २ जून रोजी सकाळी शेजारील महिलेने सावंत यांना फोन करून त्यांच्या बंगल्याचे कुलूप फोडल्याचे सांगितले. सावंत यांनी पुणे येथून कलमठ येथे आल्यावर पाहिले सोन्याचे दागिने, चांदीचे पैजण व रोख रक्कम १५ हजार रुपये लंपास केल्याचे निदर्शनास आले. तसेच राजाराम बाळाजी देसाई,  सुभाष दिनकर नाईक यांचे घराचा कडी कोयंडा तोडून चोरटयाने चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या घरातील कोणतीही वस्तु चोरीस गेलेली नाही. तसेच माधव शंकर ढेकणे यांच्या घरातील रोख रक्कम ६००० रुपये व चांदीचे वाळे, चांदीची कंबर साखळी असे दागिने चोरले आहेत. एकुण १,७३,७००रुपयांचा मुद्देमाल या चोरीत लंपास केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस