शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

आंबोली परिसरात आठवड्यात सापडले चार मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 12:09 AM

सावंतवाडी: आंबोली कावळेसाद येथील दरीत युवक व युवतीचे मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. हे दोन्ही मृतदेह साधारणपणे एक महिन्यापूर्वीचे असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सावंतवाडी: आंबोली कावळेसाद येथील दरीत युवक व युवतीचे मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. हे दोन्ही मृतदेह साधारणपणे एक महिन्यापूर्वीचे असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. एक महिन्यापूर्वी पोलिसांना कावळेसाद जवळ एक दुचाकीही मिळाली होती. त्याचीच ही दुचाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरूवारी सायंकाळी हे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत आंबोलीत आठवडा भरात चार मृतदेह सापडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांचा मृतदेह आंबोलीतील कावळेसाद येथील दरीतून काढत असताना तेथे आणखी दोन मृतदेह असल्याचे आपत्कालीन पथकाने पोलिसांना सांगितले होते. त्यावरून पोलिसांनी आपत्कालीन पथकाला दरीत उतरून मृतदेह शोधण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे सांगेलीतील आपत्कालीन टिम दरीत उतरली होती.सकाळपासून या पथकाने शोधमोहीम हाती घेतली.  त्यांना सायंकाळी हे मृतदेह शोधण्यात यश आले. मात्र मृतदेहाचे अवशेष शिल्लक राहिले होते. दोन मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. आपत्कालीन पथकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार एक मृतदेह युवकाचा तर दुसरा युवतीचा असल्याचे सांगितले. मृतदेहाच्या अवशेषांवर फक्त कपडेच होते. सायंकाळी उशिरा मृतदेह दरीतून वर काढल्यानंतर वैद्यकीय तपासणी घटनास्थळीच करण्यात आली.दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक महिन्याभरापूर्वी एक दुचाकी या परिसरात आढळून आली होती. या दुचाकीवरून युवक व युवती आली होती. या दोघांनाही परिसरात पाहिले आहे. ती आंबोलीतील एका हॉटेलात राहिल्याचेही पोलीस तपासात पुढे आले आहे. ही दुचाकी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सावर्डे येथील मोरे नामक व्यक्तीच्या नावावर आहे. ती दुचाकी मुरगूड पोलिसांकडे जमा करण्यात आली आहे. त्यामुळे ही दोघे सावर्डे येथीलच असावेत, असा अदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.पोलिसांनी दुचाकीवरून मृतदेह सावर्डे येथील असल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर शुक्रवारी मोरे याना आंबोली येथे बोलावण्यात आले आहे. ते आल्यानंतरच नेमकी वस्तूस्थिती काय ती कळू शकेल, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, पोलीस हेडकाँस्टेबल विश्वास सावंत, अमोद संरगले, प्रकाश कदम, तानाजी देसाई आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तर सांगेली येथील आपत्कालीनचे बाबल आल्मेडा, नार्वेकर आदींनी शोध घेतला आहे.