कणकवलीत नगराध्यक्षांसह चौघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 18:02 IST2020-04-19T18:00:15+5:302020-04-19T18:02:07+5:30
कणकवली : कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिरा नजीक आशिष यशवंत जमादार या पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली . तसेच पोलीस ठाण्यात ...

कणकवलीत नगराध्यक्षांसह चौघांवर गुन्हा दाखल
कणकवली : कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिरा नजीक आशिष यशवंत जमादार या पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली . तसेच पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी पोलिसांनी कणकवली नगराध्यक्षांसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १६ मार्चला सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलीस कर्मचारी जमादार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे , नगरसेवक अबिद नाईक , संदीप नलावडे आणि जावेद शेख (सर्व राहणार कणकवली ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.