शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस-राणे कुटुंबातील संघर्ष वाढणार? निलेश राणेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 11:31 IST

सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानं आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे. 

सिंधुदुर्ग : आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाबाहेर पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांवर काल, मंगळवारी रात्री उशिरा ओरोस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे पोलीस आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.यामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार किंवा त्यापेक्षा जास्त जमाव केल्या प्रकरणी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८८ आणि २६८,२७०, पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी १८६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा न्यायालयाच्या बाहेर जमलेली भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी व आमदार नितेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडवल्या नंतर पोलिसांशी भाजपा कार्यकर्त्यांची झालेली बाचाबाची व बेकायदेशीर जमाव करणे, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे यासह अन्य कारणे दाखवत पोलिसांकडून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घेतल्याप्रकरणी आपण सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात भेट देणार व तक्रार देणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी दिली होती.नितेश राणे हे स्थानिक आमदार आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या अधिकाराखाली त्यांना अडवला आहात, असा सवाल करत निलेश राणेंनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानं आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNilesh Raneनिलेश राणे Nitesh Raneनीतेश राणे PoliceपोलिसBJPभाजपा