देवगड समुद्र किनाऱ्यावरील मारहाण प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 18:22 IST2017-10-24T18:18:31+5:302017-10-24T18:22:35+5:30
मागील वाकडीकीच्या कारणावरून देवगड समुद्रकिनारी वाळूवर बोलावून घेऊन जयदेव नारायण कांदळगांवकर व राकेश गगनसिंंग वाल्मिकी (रा. देवगड) यांना मारहाण केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी किल्ला येथील पाचजणांविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी दुपारी २.३० वाजण्याचा सुमारास घडली.

देवगड समुद्र किनाऱ्यावरील मारहाण प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
देवगड , दि. २४ : मागील वाकडीकीच्या कारणावरून देवगड समुद्रकिनारी वाळूवर बोलावून घेऊन जयदेव नारायण कांदळगांवकर व राकेश गगनसिंंग वाल्मिकी (रा. देवगड) यांना मारहाण केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी किल्ला येथील पाचजणांविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी दुपारी २.३० वाजण्याचा सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड किल्ला येथील अझर शेख, अमोल गोळवणकर, नथुराम मणचेकर, अल्ताफ होलसेकर व नीतेश तेली यांनी सोमवारी दुपारी २ वाजण्याचा सुमारास फोन करून जयदेव नारायण कांदळगांवकर याला देवगड समुद्रकिनारी वाळूवर बोलावून घेतले.
जयदेव कांदळगांवकर हा त्याचा सहकारी राकेश गगनसिंंग वाल्मिकी याच्यासमवेत देवगड समुद्रकिनारी वाळूवर गेला असता मागील वाकडीकीच्या कारणावरून पाचहीजणांनी त्यांना हाताच्या ठोशाने मारहाण केली.
या मारहाणप्रकरणी जयदेव नारायण कांदळगांवकर यांनी देवगड पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून किल्ला येथील अझर शेख, अमोल गोळवणकर, नथुराम मणचेकर, अल्ताफ होलसेकर व नीतेश तेली या पाचहीजणांना अटक केली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर शिवगण करीत आहेत.