शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

आत्मनिर्भर कक्ष करणारी ही पहिलीच नगरपंचायत : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 6:12 PM

Nitesh Rane, vaibhavwadi , sindhudurgnews केंद्र शासनाने सुरू केलेल्या आत्मनिर्भर योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांना व्हावा; या हेतूने स्वतंत्र आत्मनिर्भर कक्ष सुरू करणारी वाभवे वैभववाडी ही देशातील पहिली नगरपंचायत आहे. या कक्षाचा अडचणीत असलेल्या लोकांना पुन्हा उभे करण्यासाठी निश्चितच उपयोग होईल, असे मत आमदार नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्दे आत्मनिर्भर कक्ष करणारी ही पहिलीच नगरपंचायत : नीतेश राणे वैभववाडीत उद्घाटन, लोकांच्या पुनर्निर्माणासाठी होणार उपयोग

वैभववाडी : केंद्र शासनाने सुरू केलेल्या आत्मनिर्भर योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांना व्हावा; या हेतूने स्वतंत्र आत्मनिर्भर कक्ष सुरू करणारी वाभवे वैभववाडी ही देशातील पहिली नगरपंचायत आहे. या कक्षाचा अडचणीत असलेल्या लोकांना पुन्हा उभे करण्यासाठी निश्चितच उपयोग होईल, असे मत आमदार नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केले.वैभववाडी नगरपंचायत कार्यालयात आत्मनिर्भर कक्षाचे उद्‌घाटन राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगराध्यक्षा समिता कुडाळकर, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, बांधकाम सभापती संतोष पवार, नगरसेवक रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, सुचित्रा कदम, दिलीप रावराणे, मुख्याधिकारी सूरज कांबळे, स्नेहलता चोरगे आदी उपस्थित होते.राणे म्हणाले, लोकांनी स्वावलंबी व्हावे, तळागाळातील प्रत्येकाला रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून येथील लोकांना चांगली संधी उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी नगराध्यक्षा कुडाळकर यांनी आतापर्यंत नगरपंचायतीकडे १०० प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी ४० प्रस्ताव बँकेकडे देण्यात आले होते. त्यातील १८ प्रस्तावाना मंजुरी मिळाली आहे. उर्वरित प्रस्तावांना मंजुरी मिळण्यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे सांगितले.आत्मनिर्भर योजनेचे ए. एस. पाटील यांनी आत्मनिर्भर ही दुर्लक्षित घटकांसाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेतून लाभार्थ्यास विनातारण बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.प्रशिक्षित कर्मचाऱ्याची नियुक्तीयोजनेचे प्रस्ताव करताना काही अडचणी, समस्या निर्माण झाली तर तिची सोडवणूक वेळेत व्हायला हवी यासाठी नगरपंचायतीने आत्मनिर्भर भारत कक्ष स्थापन केला आहे. नगरपंचायतीने सुरू केलेला हा देशातील पहिला कक्ष आहे. या कक्षामध्ये एक प्रशिक्षित कर्मचारी असणार आहे. हा कर्मचारी लाभार्थ्याने कागदपत्राची पूर्तता केली आहे का याची चाचपणी करेल. काही कागदपत्रांमध्ये त्रुटी असतील तर त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने लाभार्थ्यास सहकार्य करेल. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडी