लांब पल्ल्याची पहिली एसटी बस धावली, तब्बल पावणेतीन महिन्यांनंतर सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 11:02 AM2020-06-23T11:02:32+5:302020-06-23T11:04:07+5:30

सावंतवाडी एसटी आगारातून तब्बल पावणेतीन महिन्यांनंतर पुणे-निगडी ही राज्यांतर्गत लांब पल्ल्याची पहिली एसटी बस २२ प्रवाशांना घेऊन रवाना झाली. या बससाठी प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केले होते.

The first long-distance ST bus ran, starting after a staggering five months | लांब पल्ल्याची पहिली एसटी बस धावली, तब्बल पावणेतीन महिन्यांनंतर सुरुवात

लांब पल्ल्याची पहिली एसटी बस धावली, तब्बल पावणेतीन महिन्यांनंतर सुरुवात

Next
ठळक मुद्दे लांब पल्ल्याची पहिली एसटी बस धावली तब्बल पावणेतीन महिन्यांनंतर सुरुवात

सावंतवाडी : सावंतवाडी एसटी आगारातून तब्बल पावणेतीन महिन्यांनंतर पुणे-निगडी ही राज्यांतर्गत लांब पल्ल्याची पहिली एसटी बस २२ प्रवाशांना घेऊन रवाना झाली. या बससाठी प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केले होते.

लॉकडाऊन काळात पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली होती. एसटी महामंडळाच्या सावंतवाडी आगारातून ही गैरसोय दूर कण्यासाठी पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांना गु्रप बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या प्रवासासाठी २२ प्रवाशांची संख्या असणे आवश्यक होते.

प्रासंगिक कराराअंतर्गत ही बस सेवा सुरू करण्यात आली असून वैद्यकीय दाखला व आधारकार्ड त्यासाठी आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजता ही बस पुणे-निगडी येथे रवाना झाली.

यावेळी आगार व्यवस्थापक मोहनदास खराडे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक वैभव पडोळे, अरुण पवार, रामचंद्र वाडकर, ए. व्ही. राणे, एम. बी. नानचे, बसचालक रामदास कोलगावकर, बापू कदम व प्रवासी उपस्थित होते. प्रवाशांना आगरातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

या गु्रप बुकिंगला मिळालेला प्रतिसाद पाहून पुणे येथे ही फेरी सोडण्यात येणार आहे. ज्या प्रवाशांना प्रवास करावयाचा आहे त्यांनी सावंतवाडी आगारात नावे नोंदवावीत, असे आवाहन आगार व्यवस्थापक खराडे यांनी केले आहे.

प्रासंगिक करारांतर्गत सेवा

लॉकडाऊन काळात एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाअंतर्गत काही एसटी फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, कोल्हापूर, मुंबई, पुणे या लांब पल्ल्याच्या एसटी बसेस बंद होत्या. प्रासंगिक करार या योजनेंतर्गत ही सेवा असून तसे भाडे आकारले जात आहे. प्रवास करणाºया प्रवाशांना त्यांचा वैद्यकीय दाखला व आधारकार्ड देणे बंधनकारक केले आहे.

Web Title: The first long-distance ST bus ran, starting after a staggering five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.