नदीत आंघोळ करताना हत्तीवर फटाके-सुतळी बॉम्ब फेकले; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 07:55 IST2025-11-08T07:55:11+5:302025-11-08T07:55:59+5:30
व्हिडिओ व्हायरल

नदीत आंघोळ करताना हत्तीवर फटाके-सुतळी बॉम्ब फेकले; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील प्रकार
सावंतवाडी : हत्तीला शासकीय कर्मचाऱ्यांकडून च दांड्याने मारल्याचा प्रकार ताजा असतनाच आता बांदा येथे स्थिरावलेल्या ओंकार हत्तीवर तुळसाण येथील नदीत आंघोळ करताना सुतळी बॉम्ब तसेच फटाके टाकण्यात आले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वीची ही घटना असून शुक्रवारी रात्री हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व थरातून संताप व्यक्त होत आहे. तसेच संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दोडामार्ग तालुक्यातून थेट गोव्यात गेलेल्या हत्ती आपला मोर्चा गोव्याच्या सिमेवर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मडूरा रोणापाल या गावात वळवला त्यानंतर तो इन्सुली वाफोली विलवडे ओटवणे तांबुळी भालावल परिसरात गेला त्यानंतर आता तो बांदा परिसरात पुन्हा आला असून तेथेच तो गेले चार दिवस स्थिरवला आहे. दोन दिवसापूर्वीच बांदा तुळसाण पुलाच्या खाली हा हत्ती नदीत आंघोळ करत असतनाच. यावेळी त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या वनविभागाच्या काहि कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर चक्क फटाके टाकण्यात आले असल्याचे काहि ग्रामस्थांकडून बघितले.त्यानंतर ग्रामस्थ चांगलेच संतापले सुतळी बॉम्ब ही टाकण्यात आल्याने तो हत्ती धास्तावला आहे. त्यामुळे त्याच्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे.
तर दुसरीकडे ओंकार हत्ती हा माणसाळलेला आहे त्यामुळे त्याला अशाप्रकारे वागणूक देणे चुकीचे आहे. एकीकडे त्या ठिकाणी असलेले लोक मोठ्या आस्त्थेने केळीचे घड व अन्य खाद्य घालतात परंतु वनविभागाचे कर्मचारी त्यांना खाद्य घालू नका असे सांगून लोकांना अटकाव करतात. त्यामुळे असे प्रकार होत आहे.असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
याबाबत खुद्द काहि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारे एका वन्य प्राण्यांना वागणूक देणे अत्यंत चुकीचे आहे. दांड्याने मारहाण झाल्यानंतर तो हत्ती थोडा बिथरला आहे. तो अनेकांचा पाठलाग करत आहे. त्यामुळे असाच प्रकार सुरू झाल्यास त्याच्याकडून मनुष्य आणि किंवा जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे याबाबत आता आमच्या वरिष्ठांनी योग्य ती भूमिका घेणे गरजेचे आहे असे सांगितले.
नदीत आंघोळ करताना हत्तीवर फटाके, सुतळी बॉम्ब फेकले; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील प्रकार, व्हिडिओ व्हायरल. #elephantpic.twitter.com/QZOFz8oKEt
— Lokmat (@lokmat) November 8, 2025