देवगड तालुक्यातील हिंदळे-खांबड येथील बागायतीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 17:28 IST2017-12-12T17:27:46+5:302017-12-12T17:28:42+5:30
देवगड तालुक्यातील हिंदळे-खांबड येथे वीज वितरणच्या डीपीमध्ये शॉर्टसर्किट होऊन येथील आंबा कलमांच्या बागेला अचानक आग लागली. या लागलेल्या आगीत ३७ गुंठे क्षेत्रातील ४६ आंबा कलमे व काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

हिंदळे येथील आगीत आंबा, काजू बाग भक्ष्यस्थानी पडली.
मिठबांव : देवगड तालुक्यातील हिंदळे-खांबड येथे वीज वितरणच्या डीपीमध्ये शॉर्टसर्किट होऊन येथील आंबा कलमांच्या बागेला अचानक आग लागली. या लागलेल्या आगीत ३७ गुंठे क्षेत्रातील ४६ आंबा कलमे व काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
रविवारी सायंकाळच्या सुमारास लागलेली आग उष्णता आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या वाऱ्यामुळे सर्वत्र पसरू लागली. नजीकच्या ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन इतर ठिकाणी पसरणारी आग वेळेतच आटोक्यात आणली.
या आगीत किशोर परब, संतोष परब, चंद्रशेखर पाताडे यांच्या मालकीची आंबा व काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. नुकसानीचा पंचनामा हिंदळे तलाठी नरेश नाईक यांनी केला.