वेंगुर्ला पोलीस “हाय अलर्ट”; किनारपट्टीवर बोटी, गाड्यांची कसून चौकशी
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 18, 2022 18:12 IST2022-08-18T18:11:52+5:302022-08-18T18:12:36+5:30
बोटींमध्ये एके-४७ सह काही शस्रास्त्रे सापडल्याने महाराष्ट्रात हायअलर्ट जारी

वेंगुर्ला पोलीस “हाय अलर्ट”; किनारपट्टीवर बोटी, गाड्यांची कसून चौकशी
वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) : मुंबईजवळील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या समुद्रात दोन संशयास्पद बोटी सापडल्याने एकच खळबळ उडाली. या बोटींमध्ये एके-४७ सह काही शस्रास्त्रे सापडल्याने महाराष्ट्रात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या अनुषंगाने वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व हॉटेल, लॉजिंगची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.
वेंगुर्ला हद्दीतील लँडिंग पॉईंट व कोस्टल पॉईंट येथे पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. समुद्रकिनारी असलेले सर्व हॉटेल/लॉजिंगची तपासणी सुरू आहे. स्थानिक मच्छीमार, सागर रक्षक दल सदस्य आणि वारडन यांना देखील सतर्क करण्यात आलेले असून संशयित हालचाल आढळून आल्यास तत्काळ पोलीस ठाण्यास माहिती देण्याबाबत कळविण्यात आले आहे.
दरम्यान आम्ही स्वतः समुद्रातून येणाऱ्या बोटी बंदरावर चेक करीत आहोत. तसेच बोटीवर कामास असलेले खलाशी व बाहेरील राज्यातील आलेल्यांची चौकशी करीत आहोत, असे जाधव यांनी सांगितले.