नशेत केलेले प्रताप महागात, बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 16:22 IST2021-05-29T16:19:13+5:302021-05-29T16:22:47+5:30
Crimenews Kankavli Police Sindhudurg : कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात कार्यरत असलेल्या आरोग्य पथक व पोलिसांशी हुज्जत घालत अरेरावी केल्याप्रकरणी तरंदळे बौद्धवाडी येथील अजित मनोहर कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले. एकेरी भाषेत पोलिसांना दादागिरी करण्याचा त्या तरुणाचा प्रयत्न अखेर त्याच्या अंगाशी आला. तो तरुण मद्यपान करून असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कणकवली येथे पोलिसांशी अरेरावी करणाऱ्या त्या तरुणाला सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी ताब्यात घेतले.
कणकवली : शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात कार्यरत असलेल्या आरोग्य पथक व पोलिसांशी हुज्जत घालत अरेरावी केल्याप्रकरणी तरंदळे बौद्धवाडी येथील अजित मनोहर कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले. एकेरी भाषेत पोलिसांना दादागिरी करण्याचा त्या तरुणाचा प्रयत्न अखेर त्याच्या अंगाशी आला. तो तरुण मद्यपान करून असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोग्य पथकाच्या कर्मचार्यांनाही त्याने वारंवार त्रास देत एकेरी भाषेत बोलून त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला. दरम्यान याचवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने तरुणाने पोलिसांशी देखील वाद घातला. तसेच खंडागळे यांच्या देखील अंगावर जात अरेरावीचा प्रयत्न केला. तर त्या तरुणाकडून पोलिसांनी माझ्या कानशिलात मारले असा आरोप केलाय. अखेर त्याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तो तरुण मद्यपान करून असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
नशेत असलेल्या त्या तरूणाने केलेले प्रताप आता त्याला महागात पडणार आहे .त्या तरुणाला वैद्यकीय चाचणीसाठी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तेथे देखील त्या तरुणाने पोलिसांशी वाद घातल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांकडून त्यांच्यावर बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सागर खंडागळे यांनी दिली. हा प्रकार कणकवली पटवर्धन चौकात शनिवारी दुपारी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला . याप्रसंगी तेथे पोलिसांसह कणकवली मुख्याधिकारी व नगरपंचायतचे पथक देखील उपस्थित होते.