Nilesh Rane: 'निलेश राणेंवर त्वरीत गुन्हा दाखल करा' video
By सुधीर राणे | Updated: January 17, 2023 16:06 IST2023-01-17T16:05:38+5:302023-01-17T16:06:47+5:30
कणकवली : माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द, खासदार संजय राऊत यांना मारण्याची धमकी ...

Nilesh Rane: 'निलेश राणेंवर त्वरीत गुन्हा दाखल करा' video
कणकवली : माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द, खासदार संजय राऊत यांना मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी निलेश राणेंवर तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी युवासेनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतच्या मागणीचे निवेदन कणकवली पोलिसांना देण्यात आले आहे.
निलेश राणे यांनी १६ जानेवारीला त्यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारले आहेत. तसेच खासदार संजय राऊत यांना मारण्याची धमकी दिली आहे. यावरुन युवासेनेच्यावतीने निलेश राणेंवर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी केली आली आहे. याबाबतचे निवेदन कणकवली पोलिसांना दिले आहे. तसेच गुन्हा दाखल न झाल्यास युवासेनेच्या माध्यमातून जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
पोलिसांना निवेदन देताना युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, अनुप वारंग, अॅड. हर्षद गावडे, तेजस राणे, गुरु पेडणेकर, आबू मेस्त्री, संदीप गावकर, निलेश परब, भाई साटम, इमाम नावलेकर, प्रतिक रासम, तात्या निकम, स्वप्नील शिंदे आदींसह युवासेना पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.
संज्या, उद्धव हे लक्षात राहू दे. pic.twitter.com/0fUxLilbh8
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 16, 2023