शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गडगडीच्या पाण्यासाठी २५पासून उपोषण

By admin | Updated: January 19, 2016 23:41 IST

जाधव यांचा इशारा : तहसील कार्यालयासमोर आंदोलन

देवरुख : गडगडी धरणाचे पाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध व्हावे, तसेच देवरूख येथील डॉ. आंबेडकर वसतिगृह शासनाच्या जागेत स्थलांतरीत व्हावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी अ. वि जाधव आणि कार्यकर्ते देवरुख तहसील कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बेमुदत उपोषण छेडणार आहेत.या उपोषणाला सिद्धार्थ कासारे पाठिंबा देणार आहेत. संगमेश्वर तालुक्यातील वाशी-किंजळे येथील गडगडी धरणाला सुमारे ३०पेक्षा अधिक वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. धरणामध्ये कित्येक कोटी रुपयांचा निधी जिरला आहे. मात्र, तीस वर्षांच्या कालावधीनंतरही वाशी, काटवली, देवळे, फणसवळे, शेरेवाडी, सायले, विघ्रवली, मुचरी, कोसुंब आदी गावातील शेतकऱ्यांना धरणाचे पाणी उपलब्ध होऊ शकलेले नाही. कित्येक कोटी रुपये खर्च होऊनही पाणी उपलब्ध होत नाही, या गंभीर समस्येकडे शासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. शासनाच्या अनास्थेमुळे येथील शेतकरी वंचित राहिले आहेत.शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता अ. वि. जाधव आणि कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषणाचे अस्त्र हाती घेतले आहे.सुमारे ३० ते ३२ वर्षे गडगडी धरणाचे काम चालू आहे. शासनाचे कोट्यवधी रुपये खर्ची पडलेले आहेत. परंतु शासनकर्त्यांना अजिबात देणे-घेणे नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला साथ देऊन दूध उत्पादन करण्यासाठी या भागात २५० संकरीत गाई खरेदी केल्या जाणार आहेत. काटवली सहकारी दूध संस्था १०० गाई शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी साथ देणार आहे. हिरवा चारा पाण्याशिवाय निर्माण होणार नाही म्हणून या आंदोलनाद्वारे आम्हाला कालव्याद्वारे गडगडी धरणाचे पाणी पाहिजे, असे जाधव यांनी म्हटले आहे.तसेच देवरूख येथे डॉ. आंबेडकर मागासवर्गीय शासकीय विद्यार्थी वसतिगृह गेली अनेक वर्षे भाड्याच्या खासगी जागेत खितपत पडलेले आहे. शासनाने एक कोटी वीस लाख रुपयात जागेसह तयार इमारत खरेदी केली आहे. इमारत अनेक वर्षे बंद असल्याने दुरुस्तीला आली आहे. दुरुस्तीसाठीही निधी मंजूर होता. परंतु तो निधी परत का पाठवण्यात आला, ही बाब ही गंभीर आहे, असेही जाधव यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)गडगडी धरण : शेतकऱ्यांना पाणी द्यासंगमेश्वर तालुक्यात ३० वर्षापासून गडगडी धरणाचे काम सुरू आहे. या धरणासाठी कोटी रूपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तरीदेखील धरणाचे काम पूर्ण झालेले नाही. या धरणातील पाणी परिसरातील शेतकऱ्यांना मिळावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून करण्यात येत आहे. मात्र, या मागणीकडे अद्याप दुर्लक्षच करण्यात आले आहे. ही मागणी शासनस्तरावरून अद्याप पूर्ण झालेली नाही. या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. केवळ आंदोलन करण्यापलिकडे येथील शेतकऱ्यांच्या हाती काहीच राहिलेले नाही. देवरूख तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनातून ही मागणी पूर्णत्वास जाण्याची आशा आहे.वसतिगृहासाठी लढादेवरुख येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. तरीदेखील गेली अनेक वर्षे भाड्याच्या जागेत खितपत पडावे लागत आहे.