शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

म्हणून पालकमंत्र्यांसमोरच शेतकरी ढसाढसा रडला 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 12:42 AM

महसूल खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे त्रस्त शेतकऱ्याने पालकमंत्र्यांच्या पुढ्यातच महसूलच्या कारभारावर आक्रोश व्यक्त केला.

सावंतवाडी - सामाईक जमिनीत कोणत्याही प्रकारचा फेरफार व रजिस्टार उतारा नसताना महसूल विभागाने २४ एकरमध्ये नोंद घातल्याने नेतर्डेतील स्थानिक शेतकरी जगदेव गवस यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत आपला संताप व्यक्त करत त्याच्या समोरच ढसाढसा रडतच सिंधुदुर्गातील पहिल्या शेतक-याची आत्महत्या सावंतवाडीत होईल आणि याला सर्वस्वी जबाबदार महसूल खाते असेल, असे सांगितले. याबाबतची गंभीर दखल घेत हा विषय तातडीने मार्गी लावा, अशी सूचना पालकमंत्री केसरकर यांनी तहसीलदार सतीश कदम यांना केली.

नेतर्डे येथे सामाईक जमीन आहे. या जमिनीतील २४ एकर जमीन कोणत्याही प्रकारचा फेरफार उतारा नसताना तसेच रजिस्टारकडे नोंद नसताना नावावर चढविण्यात आली. याबाबत वेळोवेळी महसूल विभागाकडे दाद मागितली, तर प्रत्येक अधिकारी व कर्मचारी हा दुसºयाकडे बोट दाखवतो. तहसीलदार सतीश कदम तर उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, असे म्हणत जगदेव गवस यांनी मंत्री दीपक केसरकर यांची येथील नव्या एचआरडी सेंटरला भेट घेतली आणि आपली कैफियत मांडली. मी प्रत्येक वेळी तहसीलदारांकडे येतो, पण ते कोणत्याही प्रकारची दाद देत नाहीत. महसूलने सगळा घोळ घालून ठेवला आहे. त्यामुळे मी आता काय करू, असा सवाल मंत्री केसरकर यांना केला. यावेळी मंत्री केसरकर यांनी मी बघतो असे म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, पण जगदेव गवस यांनी मला न्याय मिळाला नाही तर यापुढे गप्प बसणार नाही. सिंधुदुर्गमधील पहिली शेतकरी आत्महत्या सावंतवाडीत होईल, असा इशारा मंत्री केसरकर यांना दिला आहे.यावेळी गवस यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी पालकमंत्र्यांच्या पुढ्यातच महसूलच्या कारभारावर आक्रोश व्यक्त करत मला प्रत्येकजण डावलतात, असे सांगितले. यावेळी समोरच असलेल्या तहसीलदार कदम यान्ाां मंत्री केसरकर यांनी तुम्ही हा विषय लवकर मार्गी लावा, आम्हाला हा विषय संपवायचा आहे, असे सांगितले. तसेच याबाबत मी ही बैठक घेईन, असे यावेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले. त्यानंतर जगदेव गवस हे शांत झाले.

टॅग्स :Farmerशेतकरीnewsबातम्याDeepak Kesarkarदीपक केसरकर