फणसगाव कॉलेजचे पथनाट्य प्रथम

By Admin | Updated: December 27, 2014 00:03 IST2014-12-26T21:17:14+5:302014-12-27T00:03:01+5:30

उडाण महोत्सव : साळगाव अध्यापक विद्यालयातील कार्यक्रम

FanSgaon College Pathalatya First | फणसगाव कॉलेजचे पथनाट्य प्रथम

फणसगाव कॉलेजचे पथनाट्य प्रथम

फणसगांव : मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विभागाच्यावतीने कुडाळ तालुक्यातील प्रमोद धुरी अध्यापक विद्यालय साळगाव येथे आयोजित केलेल्या उडाण महोत्सव २०१४ मध्ये फणसगाव कॉलेजच्या ‘फेस्टिव्हल’ या पथनाट्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
सध्याच्या जगात सण साजरे करताना वापरली जाणारी आधुनिकता त्यामुळे ढासळत चाललेली संस्कृती व त्याचे होणारे वाईट परिणाम या विषयावरील प्रबोधनात्मक व बहारदार सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
मागील वर्षापासून फणसगाव कॉलेजने सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात एका पाठोपाठ एक स्पर्धांमध्ये चकमदार कामगिरी करीत यश संपादन केले आहे. त्यामुळे या महाविद्यालयाने या क्षेत्रात एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. कोणत्याही स्पर्धेत उतरताना ते बाजी मारायचीच हा विचार पक्का करूनच सहभागी होतात. अर्थातच यामागे या विद्यार्थ्यांची जिद्द व रात्रीचा दिवस करून केली जाणारी मेहनत महत्त्वाची आहे. या संघाला मुंबई विद्यापीठाचे आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉ. दिलीप पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत संघांनी सहभाग घेतला होता. फणसगाव महाविद्यालयाच्या चमूमध्ये शिल्पा घोरपडे, प्राची पवार, रोशन सोये, प्राजक्ता गुरव, स्नेहल पाटील, आशिष घाडी, अक्षय घाडी, अक्षय पाळेकर, अनिकेत खाडये, सागर जाधव या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या सर्व विद्यार्थ्यांना प्रसिद्ध दिग्दर्शक व लेखक कुणाल जामसंडेकर, सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक समन्वयक
प्रा. आशिष नाईक व प्रा. ज्योत्स्ना कदम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)

Web Title: FanSgaon College Pathalatya First

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.