शिवसेनेच्या खासदार , आमदार , पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 15:06 IST2019-09-13T15:04:53+5:302019-09-13T15:06:29+5:30
सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या खासदार , आमदार व पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषे दाखविणे सुरू असून विविध विकासकामांची फक्त भूमिपूजने करण्यात येत आहेत. सध्या टीव्हीवर गाजत असलेल्या ' अल्टी - पल्टी ' मालिकेप्रमाणेच या तिघांचे ' अल्टी,पल्टी, कल्टी' असे कारनामे विकासकामांबाबत सुरू आहेत. अशी टीका मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

शिवसेनेच्या खासदार , आमदार , पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषे
कणकवली : सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या खासदार , आमदार व पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषे दाखविणे सुरू असून विविध विकासकामांची फक्त भूमिपूजने करण्यात येत आहेत. सध्या टीव्हीवर गाजत असलेल्या ' अल्टी - पल्टी ' मालिकेप्रमाणेच या तिघांचे ' अल्टी,पल्टी, कल्टी' असे कारनामे विकासकामांबाबत सुरू आहेत. अशी टीका मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.
कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर उपस्थित होते.
यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी कणकवली येथे ट्रामा केअर सेंटर उभारणार असे आश्वासन दिले होते. त्यांनंतरच्या पाच वर्षांच्या कालावधीत त्यांनी तिकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.
त्याचप्रमाणे कुडाळ येथे महिलांसाठी शासकीय रुग्णालय उभारण्याचेही आश्वासनही देण्यात आले होते. तेही पूर्ण करण्यात आलेले नाही. आता पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल १८ महिन्यात उभारण्याचे आश्वासन देऊन भूमिपूजन केले आहे. ते आश्वासनही फसवेच ठरणार आहे.
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था संपूर्ण खिळखिळी झाली आहे. तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांना गोवा, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी जावे लागते. सामान्य जनतेला चांगले उपचार जिल्ह्यात मिळणे आवश्यक असताना त्याबाबत कोणीच काही करीत नाहीत.
पालकमंत्र्यांकडे जादुई शक्ती आहे का ?
सावंतवाडी येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल १८ महिन्यात उभारण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे. इतक्या कमी कालावधीत हे आश्वासन पूर्ण होण्यासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर सांगतात त्याप्रमाणे पालकमंत्र्यांकडे जादुई अथवा कोणती तरी शक्ती आहे का ? हे त्यांनी स्पष्ट करावे.
पालकमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे चिपी विमानतळावर गणेशोत्सवात विमान उतरले नाही. मात्र, निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्या तरी नेत्याचे विमान तिथे उतरेलही. पण प्रवासी विमान कधी उतरणार ते पालकमंत्र्यांनी जाहीर करावे. अजून किमान वर्षभर तरी प्रवासी विमान तिथे उतरणार नाही. कारण अजूनही त्यासाठी लागणाºया बºयाच परवानग्या मिळायच्या अजूनही बाकी आहेत. असेही उपरकर म्हणाले.