सुनसान मालवणात जाणवले स्फोटसदृश हादरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 13:22 IST2021-04-15T13:22:00+5:302021-04-15T13:22:56+5:30

Malvan Lockdown Sindhdurug : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सुनसान झालेल्या मालवण शहरात अचानक किनारपट्टी भागात समुद्राच्या दिशेने प्रचंड आवाज झाला. या आवाजाच्या आघाताने शहरासह अनेक गावांमध्ये सौम्य हादरे जाणवले. सोशल मीडियावर प्रत्येकजण स्फोटसदृश हादऱ्याची 'अपडेट' देत होते. मात्र हा आवाज नेमका कसला हे स्पष्ट होऊ शकले नाही.

Explosive tremors were felt in the deserted Malwana | सुनसान मालवणात जाणवले स्फोटसदृश हादरे

सुनसान मालवणात जाणवले स्फोटसदृश हादरे

ठळक मुद्देसुनसान मालवणात जाणवले स्फोटसदृश हादरेस्फोटसदृश्य आवाजाबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चा

मालवण : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सुनसान झालेल्या मालवण शहरात अचानक किनारपट्टी भागात समुद्राच्या दिशेने प्रचंड आवाज झाला. या आवाजाच्या आघाताने शहरासह अनेक गावांमध्ये सौम्य हादरे जाणवले. सोशल मीडियावर प्रत्येकजण स्फोटसदृश हादऱ्याची 'अपडेट' देत होते. मात्र हा आवाज नेमका कसला हे स्पष्ट होऊ शकले नाही.

गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान स्फोटासारख्या झालेल्या प्रचंड आवाजामुळे शहरासह संपूर्ण तालुका हादरून गेला. हा आवाज नेमका कसला हे स्पष्ट होऊ शकले नाही. या आवाजामुळे शहरातील अनेक घरांना हादरे बसले.

शहरातील मेढा-राजकोट भागासह तालुक्यातील आचरा, देवबाग, देवलीसह अन्य भागात हा आवाज नागरिकांना ऐकू आला. या स्फोटसदृश्य आवाजाबाबत शहरासह तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू होती. काही जणांकडून समुद्रात स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

Web Title: Explosive tremors were felt in the deserted Malwana