पोलीस ठाण्यात तपासणीसाठी आणलेल्या कारमध्ये गांजा सापडल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 16:17 IST2020-06-19T16:16:33+5:302020-06-19T16:17:41+5:30
गस्तीदरम्यान स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कुडाळ पोलीस ठाण्यात तपासणीसाठी आणलेल्या एका कारमध्ये गांजा सापडल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पोलीस ठाण्यात तपासणीसाठी आणलेल्या कारमध्ये गांजा सापडल्याने खळबळ
कुडाळ : गस्तीदरम्यान स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कुडाळ पोलीस ठाण्यात तपासणीसाठी आणलेल्या एका कारमध्ये गांजा सापडल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यातून माहिती देण्यात आली की, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक गस्त घालत असताना त्यांनी एका कारला तपासणीसाठी थांबविले व चालकाकडे अधिक माहिती घेण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यावेळी कारचालकाने समर्पक उत्तरे दिली नाहीत.
त्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला संशय आला म्हणून ही कार त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तपासणीसाठी आणली. यावेळी या कारची तपासणी केली असता त्यात काही प्रमाणात गांजाचा साठा सापडला असल्याची माहिती दिली.
या प्रकरणी रात्री कुडाळ पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारमध्ये गांजाचा किती साठा होता हे समजू शकले नसून हा गांजा कुठून आणण्यात आला व त्याची विक्री कोठे करण्यात येणार होती? त्याचा तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.