पर्यटनदौडीत महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग
By Admin | Updated: December 28, 2014 00:11 IST2014-12-28T00:08:47+5:302014-12-28T00:11:31+5:30
गुहागर बीच फेस्टिवल : कोकण कला व खाद्य महोत्सवाचे आयोजन

पर्यटनदौडीत महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग
असगोली : अपरान्त भूमी पर्यटन विकास संस्था व समस्त गुहागरवासियांच्यावतीने आयोजित गुहागर बीच फेस्टिवल कोकण कला व खाद्य महोत्सवात गुहागर समुद्रकिनारी सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दौडमध्ये सुमारे १५०० अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण समुद्रकिनारा फुलून गेला होता.
पहिली ते चौथीच्या गटात मुलांमध्ये प्रथम क्रमांक आदित्य येवले, द्वितीय भाग्यशाली कांबळे, तृतीय स्वयंम मोरे याने मुलींमध्ये प्रथम क्रमांक जान्हवी गोयथळे, द्वितीय सायरी लांजेकर, तृतीय सायली बळवंत हिने इयत्ता पाचवी ते सातवीमध्ये प्रथम क्रमांक मनीष गुढेकर, द्वितीय गिरीराज घाडे, तृतीय क्रमांक पार्थ धामणस्कर यांनी पटकावला.
आठवी ते दहावीच्या मुलींच्या गटात प्रथम सलोनी भागडे, द्वितीय सोनाली साटले, तृतीय मैथली भागडे हिने तर मुलांमध्ये प्रथम विक्रांत घुमे, द्वितीय अजय गुरव, तृतीय ओंकार गुरव यांनी पुरुषांच्या खुल्या गटात प्रथम स्वप्नील सांगळे, द्वितीय प्रदेश तांडेल, तृतीय तेरवणकर तर महिलांमध्ये प्रथम कोमल मांडवकर, द्वितीय दर्शना सांगळे, तृतीय पुजा सांगळे यांनी पटकावले. तसेच पर्यटकांच्या दौडमध्ये पुरुष गटात प्रथम क्रमांक सुमित कांबळे, द्वितीय क्रमांक सौरभ आपटे तर, तृतीय क्रमांक चिन्मय दाभोळकर या पुणे येथील तरूणांनी पटकावला. महिलांमध्ये प्रथम क्रमांक सुमिता पेवेकर, द्वितीय क्रमांक मुुंबईची स्नेहा सुर्वे, तृतीय क्रमांक नागपूरची पूनम मंत्री हिने पटकावला.
या स्पर्धेला उपनगराध्यक्ष स्नेहा वरंडे, अपरान्त भूमी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष किरण खरे, उपाध्यक्ष विजय सावंत, उर्विमाला पॅराडाईजचे विजय साळवी, तहसीलदार वैशाली पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा मानसी शेटे, नगरसेवक प्रवीण रहाटे, संजय सावरकर, संतोष वरंडे, शामकांत खातू, नीलिमा शिर्के, जॉनसन लोकेश, थॉमस कोरिया, नगरसेविका अनुराधा कदम, मंडल अधिकारी समीर देसाई, तलाठी गजानन धावडे, डॉ. शैलेश पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नरेश पवार यांनी स्पर्धाप्रमुख म्हणून जबाबदारी पेलली. येथील नीलेश गोयथळे यांनी सूत्रसंचालन केले तर सुधाकर कांबळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)