शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

कोकण रेल्वे मार्गावर इंजिन आणि ट्रॉलीची धडक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 11:38 AM

कोकण रेल्वे मार्गावर राजापूर ते वैभववाडी स्थानक दरम्यान शेर्पे येथे कोवीड - १९ पार्सल ट्रेन रूळावर असलेल्या ट्रॉलीला धडकली . त्यामुळे रेल्वे इंजिनचे मोठे नुकसान झाले . तर केरळकडे जाणाऱ्या रेल्वे पार्सल गाडीला तीन तासाचा विलंब झाला . रेल्वे विद्युतीकरणाचा ठेका घेतलेल्या कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे . बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली .

ठळक मुद्देकोकण रेल्वे मार्गावर इंजिन आणि ट्रॉलीची धडक !सुदैवाने जीवित हानी नाही ; रेल्वे इंजिनचे नुकसान

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावर राजापूर ते वैभववाडी स्थानक दरम्यान शेर्पे येथे कोवीड - १९ पार्सल ट्रेन रूळावर असलेल्या ट्रॉलीला धडकली . त्यामुळे रेल्वे इंजिनचे मोठे नुकसान झाले . तर केरळकडे जाणाऱ्या रेल्वे पार्सल गाडीला तीन तासाचा विलंब झाला . रेल्वे विद्युतीकरणाचा ठेका घेतलेल्या कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे . बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली .कोरोना प्रादुर्भावामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतूक सेवा बंद आहे . तर अत्यावश्यक साहित्य , औषधे वाहून नेणारी पार्सल ट्रेन सुरू करण्यात आली आहे . याचाच एक भाग म्हणून मंगळवारी ओखा येथून ००९३३ ओखा - तिरूअनंतरपुरम ही गाडी सोडण्यात आली होती .बुधवारी दुपारी ११.३० च्या दरम्यान ही गाडी रत्नागिरी स्थानकातून केरळच्या दिशेने निघाली . दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान राजापूर ते वैभववाडी या स्थानका दरम्यान शेर्पे परिसरात ( २८२/ २३ किलोमीटरवर) या गाडीला रेल्वे रूळावर असलेल्या ट्रॉलीची धडक बसली .कोकण रेल्वे मार्गावर सध्या विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे . लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीने या कामाचा ठेका घेतला आहे . विद्युतीकरणासाठी वापरले जाणारे साहित्य ट्रॉलीच्या माध्यमातून ने - आण केले जात असते .

बुधवारी दुपारी कोकण रेल्वे मार्गावर पार्सल ट्रेन येत असल्याचे लक्षात येताच विद्युतीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ट्रॉली रूळावरच सोडून बाजूला उडया मारल्या. सुदैवाने मोठी दुर्घटना टळून जीवितहानी झाली नसली तरी रेल्वे इंजिनला ट्रॉलीची धडक बसल्याने इंजिनचे मोठे नुकसान झाले आहे. .दरम्यान, या अपघातात विद्युतीकरण करणाऱ्या कंपनीने दाखवलेला बेजबाबदारपणा कोकण रेल्वे कशा पद्धतीने घेते हे महत्वाचे आहे.

 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात