शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

कौशल्य विकासातून कोकणात रोजगार निर्मिती करणार!, प्रमोद जठार यांची माहिती 

By सुधीर राणे | Published: December 17, 2022 4:32 PM

कणकवली: बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार आहे. त्याठिकाणी निर्माण होणारा रोजगार पाहता कोकणातील बेरोजगारांचे कौशल्य विकास करणे आवश्यक आहे. ...

कणकवली: बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार आहे. त्याठिकाणी निर्माण होणारा रोजगार पाहता कोकणातील बेरोजगारांचे कौशल्य विकास करणे आवश्यक आहे. त्यामुळे आताच आयटीआय मधून प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण केले पाहिजे. त्यासाठी २१०० गावांमधील प्रत्येक गावातील किमान ५० मुलांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी मंत्री मंगलप्रभात  लोढा यांच्याकडे केली असून त्यादृष्टीने लवकरच मंत्रालयात बैठक होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी दिली.कणकवली येथील भाजपा कार्यालयात आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, पप्पू पुजारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.जठार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील काळात बारसू रिफायनरी प्रकल्प भूसंपादन करण्यासाठी दर जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पासाठी मी अनेक वर्षे काम करत आहे. कोकणातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी हा रिफायनरी प्रकल्प आवश्यक आहे. प्रत्येक घरातील एका व्यक्तीला नोकरी या ठिकाणी मिळेल. त्यासाठी कौशल्य विकास(स्किल डेव्हलपेंट) विभागाच्यावतीने २१०० गावांमधील प्रत्येक गावातील किमान ५० मुलांना प्रशिक्षण द्यावे अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे. त्यांनी अधिवेशन संपल्यावर तातडीने बैठक लावू असे सांगितले आहे. या बैठकीला कोकणातील आमदार उपस्थित राहतील. रिफायनरी प्रकल्प झाल्यास कोकणचा चेहरा मोहरा बदलून जाईल. येथील अर्थकारण बदलेल आणि नोकरीसाठी येथील तरुणांना मुंबई, पुण्यात जावे लागणार नाही. रिफायनरी प्रकल्पात इंजिनियर, फिटर, वायरमन अशा प्रशिक्षित लोकांची गरज लागणार आहे. त्यासाठी आपल्याकडे कार्यरत असलेल्या आयटीआयमध्ये आवश्यक असे नवे ट्रेड सुरू करून येथील बेरोजगार तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचे जठार यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गnanar refinery projectनाणार प्रकल्पBJPभाजपा