शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

किनळोस येथे हत्तींची वस्तीवर चाल

By admin | Updated: November 12, 2014 22:51 IST

शेती-बागायतीचेही हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

कडावल : किनळोस बागवेवाडी येथे मंगळवारी रात्री दोन हत्ती भरवस्तीत घुसल्यामुळे खळबळ माजली. येथील शेती- बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सातत्याने नुकसान करणाऱ्या हत्तींचा वन विभागाने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. किनळोस-बागवेवाडी येथे काल रात्री दोन रानटी हत्ती भरवस्तीत दाखल झाल्यामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली. येथील शेती-बागायतीचेही हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले. वन कर्मचारी व ग्रामस्थांनी मिळून हत्तींना वस्तीपासून दूर हाकलण्यात यश मिळविले असले, तरी तोपर्यंत शेती-बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. काल रात्री रामचंद्र बागवे यांच्या अंगणात हत्ती प्रथम दाखल झाले. त्यांनी आपल्या घराच्या पुढील पडवीत नाचणीची कणसे वाळत टाकली होती. हत्तींनी यातील काही कणसे फस्त केली. हत्तींची चाहूल लागताच घरातील माणसांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा घराच्या मागील भागाकडे वळविला. तेथे असलेल्या माड बागायतीमधील सुमारे २० माड जमीनदोस्त केले. येथील शेतकरी पंढरीनाथ बागवे यांच्या केळींचे व भातशेतीचेही या हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हत्ती येथील शेती-बागायतीचे नुकसान करत असताना ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाला दूरध्वनीवरून दिली होती. काही वेळातच वनकर्मचारी देसाई व त्यांचे प्रथम मानवी वस्तीपासून दूर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वनकर्मचारी व ग्रामस्थांनी संयुक्तपणे हत्ती हटाव मोहीम राबविंली. फटाके व डबे वाजवून हत्तींना वस्तीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. हत्तींना वाडीतून बाहेर काढण्यासाठी निकराचे प्रयत्न करण्यात आले. बऱ्याच वेळानंतर दोन्ही हत्ती वस्तीमधून बाहेर पडून बोभाटा भागाच्या दिशेने मार्गस्थ झाले. हत्ती हटाव मोहिमेत वनकर्मचाऱ्यांबरोबर शिवराम राणे, अनंत बागवे, सुरेश बागवे, दिवाकर बागवे, एकनाथ साटम, नरेश बागवे, श्रीकृष्ण बागवे, आदेश बागवे, सत्यम बागवे आदींनी सहभाग घेतला. दरम्यान, वन्य प्राण्यांकडून शेतीबागायतीचे सातत्याने नुकसान होत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. रानटी हत्तींपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वनविभागाने हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)