शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
2
कीपॅड मोबाईल, ओटीपी नाही, युपीआय नाही, तरीही पैसे गायब; गिरणी कामगाराचे ७ लाख सायबर चोरट्याकडून लंपास
3
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
4
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
5
IND vs SA : 'आत्मनिर्भर' बुमराह! मार्करमला बोल्ड केल्यावर KL राहुलसोबतचं सेलिब्रेशन ठरलं खास (VIDEO)
6
हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
7
'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
8
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
9
Multibagger Stock: पैसाच पैसा! ₹२८ च्या शेअरनं केलं मालामाल; ५ वर्षात दिला ५६,०००% पर्यंतचा तुफान रिटर्न
10
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
11
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
12
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
13
'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
14
india Israel: कॅमेरा लावलेली गोळी पोटात गेल्यावर काय होते? कुठून आल्या कल्पना?
15
Maharashtra CET: सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, कुठल्या दिवशी कोणता पेपर? वाचा
16
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
17
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
18
विनायक चतुर्थी २०२५: मार्गशीर्ष विनायक चतुर्थी ठरणार खास, गणेशकृपेने ९ राशींची पूर्ण होणार आस!
19
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
20
Tarot Card: लोभाला बळी पडू नका, मनाचा कौल घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: ‘ओंकार’ हत्तीचा बांदा परिसरात धुडगूस, भात शेतीचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:30 IST

पंचक्रोशीत भीती, अस्वस्थता अन् रोषाचे वातावरण

बांदा: गेली आठ दिवस ‘ओंकार’ हत्तीची बांदा परिसरातील कास, सातोसे, मडुरा गावात दहशत सुरूच आहे. हत्तीने अनेक शेतकऱ्यांच्या भातशेतीत मोठे नुकसान केले आहे. पिके चिरडली, बांध फोडले आणि काही ठिकाणी भाताचं पीक सपाट केले. यामुळे पंचक्रोशीत भीती, अस्वस्थता आणि रोषाचे वातावरण आहे.सध्या या भागात भात कापणीचा हंगाम सुरू आहे. हत्तीच्या दहशतीने शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. सोमवारी सायंकाळी ओंकारने मडुरा-सातार्डा मुख्य रस्त्यावर सुमारे तासभर ठिय्या मारल्याने वाहतूक ठप्प झाली होती. आज मंगळवारी दुपारी मडुरा गावातील परबवाडी परिसरात ओंकारचा वावर असल्याचे उपसरपच बाळु गावडे यांनी सांगितले. गेल्या आठवड्याभरापासून हा हत्ती कास आणि सातोसे परिसरात ठाण मांडून होता. तीन दिवसांपासून कास गावातील शेतात थैमान घातल्यानंतर सोमवारी सकाळी ओंकारने मडुरा गावात प्रवेश केला. त्याच्यामुळे गावात अक्षरशः खळबळ उडाली. काही नागरिकांनी जीव धोक्यात घालून अगदी जवळ जाऊन व्हिडिओ शूट केले. ओंकारच्या आक्रमक स्वभावामुळे दुर्घटना होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले.'ओंकार'चा रेल्वे रुळाजवळ वावरवनविभागाचे पथक सतत गस्त घालत असून, रेल्वे विभागालाही सतर्क केले आहे. सध्या हत्ती कोकण रेल्वे रुळांच्या जवळपास ८०- १०० मीटर अंतरावर वावरत आहे, त्यामुळे ट्रॅकवर तो येऊ नये यासाठी वनकर्मी सतर्क आहेत.

हत्ती पकड मोहिमेचे आश्वासन हवेत विरले हत्तीचा उपद्रव वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये वनविभागाबद्दल प्रचंड नाराजी आहे. “हत्ती पकड मोहिमेचे आश्वासन हवेत विरले आहे. दोन-तीन दिवसांत कारवाई करू असं सांगून आठवडाभर लोटला. नागरिक दिवसेंदिवस भीतीत जगत आहेत आणि वनविभाग केवळ कागदोपत्री काम करत आहे.वनविभागावर आरोप रोणापालचे माजी सरपंच सुरेश गावडे यांनीही वनविभागावर आरोप केला की, “वनविभाग केवळ तोंडी आश्वासने देतो. हत्तीच्या वावरावर नियंत्रण नाही. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेले नाहीत आणि नुकसानभरपाईही नाही. विभाग फक्त नागरिकांना चुकीची माहिती देत आहे.”नुकसानभरपाई जाहीर करा मडुरा, परबवाडी, कास, आणि सातोसे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हत्तीमुळे कापणी थांबली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. वनविभागाने तातडीने सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी अशी मागणी उपसरपंच बाळु गावडे यांनी केली.

‘वनतारा’चे पथक कधी येणार?जिल्हा उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी “दोन-तीन दिवसांत हत्ती पकड मोहीम सुरू केली जाईल” असे सांगितले होते. या मोहिमेसाठी ‘वनतारा’ या खास प्रशिक्षित पथकाला बोलावण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. परंतु, मंगळवारी दुपारपर्यंत प्रत्यक्ष कारवाई झालेली नसल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये निराशा पसरली आहे. वनविभागाने सुरुवातीला हत्तीला जंगलाकडे परतविण्याचे प्रयत्न केले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. ‘ओंकार’ हत्तीच्या सततच्या हालचालींमुळे संपूर्ण बांदा-मडुरा  पंचक्रोशीत भीती, अस्वस्थता आणि रोषाचे वातावरण आहे. भातशेतीचे मोठे नुकसान, वनविभागाची विलंबित प्रतिक्रिया आणि निष्क्रिय भूमिका यामुळे ग्रामस्थांचा विश्वास कमी होत चालला आहे. वनविभागाकडून हत्ती पकड मोहिमेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Elephant 'Omkar' wreaks havoc in Banda, damaging paddy fields.

Web Summary : Elephant 'Omkar' terrorizes Banda, Sindhudurg, damaging paddy crops. Farmers fear going to fields. Locals are angry due to delayed action by forest department. Compensation is awaited.