सिंधुदुर्ग: घरावर वीज कोसळून नुकसान, कारिवडेतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 04:48 PM2018-05-29T16:48:03+5:302018-05-29T16:48:03+5:30

सावंतवाडीसह परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच तालुक्यातील कारिवडे-डंकवाडी येथे एका घरावर विजेचा लोळ कोसळला. त्यामुळे घरातच मोठा खड्डा तयार झाला असून घरात असलेल्या आई- वडिलांसह मुलगी जखमी झाली आहे. मात्र, या घटनेत अन्य एक जण थोडक्यात बचावला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे.

Electricity collapse, house collapse | सिंधुदुर्ग: घरावर वीज कोसळून नुकसान, कारिवडेतील घटना

सिंधुदुर्ग: घरावर वीज कोसळून नुकसान, कारिवडेतील घटना

Next
ठळक मुद्देघरावर वीज कोसळून नुकसान, कारिवडेतील घटना  तिघे जखमी, आई-वडिलांसह मुलीचा समावेशसावंतवाडी परिसरात दमदार पाऊस

सावंतवाडी : सावंतवाडीसह परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच तालुक्यातील कारिवडे-डंकवाडी येथे एका घरावर विजेचा लोळ कोसळला. त्यामुळे घरातच मोठा खड्डा तयार झाला असून घरात असलेल्या आई- वडिलांसह मुलगी जखमी झाली आहे. मात्र, या घटनेत अन्य एक जण थोडक्यात बचावला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे.

सावंतवाडीत सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट होऊ लागला. तसेच काही वेळानंतर विजांचा लखलखाटही सुरू झाला. हा प्रकार बराच वेळ सुरू होता. मात्र काही काळानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. तब्बल एक तास पाऊस कोसळत होता. या पावसामुळे जनजीवन चांगलेच विस्कळीत बनले होते. बाजारात आंबा विक्रीसाठी बसलेल्यांना याचा चांगलाच त्रास झाला. सर्व आंबे भिजून गेले.


विजेचा लोळ कौले फोडून घरात आला. विजेच्या लोळाने घरात जमिनीला पडलेला खड्डा.

या पावसामुळे व विजेच्या कडकडाटामुळे शहरातील बहुतांशी भागातील बत्ती गुल झाली होती. तसेच दूरसंचार यंत्रणाही ठप्प झाली होती. आंबोलीतही मुसळधार पावसाचा कहर सुरू होता. पण गेले चार ते पाच दिवस आंबोलीत पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र यात कोणतेही नुकसान झाले नाही. कारिवडे-माडखोल परिसरात मोठ्या प्रमाणात विजेचा लखलखाट होत होता.


विजेचा लोळ कौले फोडून घरात आला. विजेच्या लोळाने घरात जमिनीला पडलेला खड्डा दिसत असून विजेच्या तीव्रतेने घरातील विद्युत मीटर जळून तो घराच्या बाहेर फेकला गेला.

त्यातूनच एक विजेचा लोळ कारिवडे-डंकवाडी येथील अंकुश रेडकर यांच्या मालकीच्या घरावर कोसळला. घरात यावेळी पत्नी अनिता रेडकर व त्यांची मुलगी अंकिता रेडकर होत्या. अचानक विजेचा कडकडाट होत वीज घरावर कोसळली.

विजेची तीव्रता एवढी भीषण होती की, विजेच्या लोळाबरोबरच आतील विद्युत मीटर घरातून बाहेर फेकला गेला. तर घराच्या मध्यभागी एक मोठा खड्डा पडला. तसेच घरात असलेल्या अंकुश यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगी यांना याचा जबर दणका बसला. विजेच्या लोळामुळे तिघेही जखमी झाले. त्यांना कुटीर रूग्णालयात दाखल केले.

ही घटना घडली तेव्हा अंकुश यांचा मुलगा अंगणात होता. त्यामुळे तो थोडक्यात बचावला आहे. या घटनेनंतर कारिवडे परिसरात एकच खळबळ उडाली होती. कारिवडे ग्रामस्थांनी डंकवाडी येथील रेडकर यांच्या घरी धाव घेत झाला प्रकार पाहिला व रेडकर कुटुंबास मदत केली. सोमवारी पडलेल्या पावसावेळी मोठ्या प्रमाणात विजा कडकडत होत्या. तसेच ढगांचा गडगडाट सुरू होता. त्यामुळे सर्वत्र सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते.

रेडकर कुटुंबीयांचे मोठे नुकसान

विजेचा लोळ घरावर पडताच विद्युत मीटर जळून तो घराबाहेर पडला. याचबरोबर घरातील विद्युत फिटींग जळून खाक झाली. काही विद्युत उपकरणेही निकामी झाली. त्यामुळे रेडकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या दुर्घटनेत तिघे जखमी झाले आहेत.

 

Web Title: Electricity collapse, house collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.