मेघा गांगण,अभिजित मुसळे, प्रतिक्षा सावंत विषय समिती सभापती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 18:07 IST2020-10-23T18:05:14+5:302020-10-23T18:07:05+5:30
kankavli, muncipaltycorporation, sindhdurugnews कणकवली नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतींची निवड शुक्रवारी बिनविरोध झाली. यावेळी प्रथमच महत्वाच्या बांधकाम समिती सभापतीपदी महिला नगरसेविकेला संधी देण्यात आली आहे . या पदावर मेघा गांगण यांची वर्णी लागली आहे.

कणकवली नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित विषय समिती सभापतींचे अभिनंदन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. (फोटो -अनिकेत उचले)
कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतींची निवड शुक्रवारी बिनविरोध झाली. यावेळी प्रथमच महत्वाच्या बांधकाम समिती सभापतीपदी महिला नगरसेविकेला संधी देण्यात आली आहे . या पदावर मेघा गांगण यांची वर्णी लागली आहे.
आरोग्य समिती सभापतीपदी अभिजित मुसळे आणि महिला बालकल्याण समिती सभापतीपदी प्रतिक्षा सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तसेच पाणी पुरवठा व जलव्यवस्थापन समिती सभापतीपदी पदसिध्द उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची निवड झाली आहे.
नगरपंचायतीच्या परमहंस भालचंद्र महाराज सभागृहात शुक्रवारी ही निवड प्रक्रिया झाली . माजी मुख्यमंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्या सुचनेनुसार ही सभापती निवड झाली आहे.
यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व नगरसेवक उपस्थित होते.बांधकाम समिती सभापतीपदी माजी नगराध्यक्षा मेघा गांगण यांना संधी देत प्रथमच महिला नगरसेविकेकडे हे पद देण्यात आले आहे. तर अनुभवी नगरसेवकांना सभापतीपदी संधी देण्यात आली आहे. नवनिर्वाचित समिती सभापतींचे नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह नगरसेवकांनी अभिनंदन केले.