दिवाणी दाव्याच्या तारखेसाठी वेंगुर्ला न्यायालयात आलेल्या वृद्धाचा पडून मृत्यू

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 18, 2023 12:00 IST2023-03-18T12:00:30+5:302023-03-18T12:00:52+5:30

बसल्या ठिकाणी खाली कोसळले

Elderly man who came to Vengurla court for civil suit date collapses to death | दिवाणी दाव्याच्या तारखेसाठी वेंगुर्ला न्यायालयात आलेल्या वृद्धाचा पडून मृत्यू

संग्रहित छाया

वेंगुर्ला : येथील न्यायालयात दिवाणी दाव्याच्या तारखेसाठी आलेल्या हरिश्चंद्र आत्माराम केरकर (वय-७१) रा. रेडी-सुखभटवाडी यांचा व्हरांड्यात बसलेले असताना खाली पडून मृत्यू झाला. याप्रकरणी वेंगुर्ला पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. ही घटना काल, शुक्रवारी घडली.

वेंगुर्ला पोलिस ठाणे येथे हर्षल हरिश्चंद्र केरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार  १७ मार्चला मृत हरिश्चंद्र केरकर हे त्यांच्या दिवाणी दाव्याच्या तारखेसाठी वेंगुर्ला न्यायालयात आले होते. न्यायालयाचे कामकाज सुरू असताना ते बाहेरील व्हरांड्यात बसले होते.

दरम्यान, बसल्या ठिकाणी ते खाली कोसळले. त्यांना अत्याव्यस्त वाटू लागल्याने तात्काळ अधिक उपचारासाठी त्यांना वैद्यकीय अधिकारी वेंगुर्ला यांच्याकडे दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता मयत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी अधिक तपास पोलिस धुरी करीत आहेत.

Web Title: Elderly man who came to Vengurla court for civil suit date collapses to death