ट्रक चालक खून, दरोडा प्रकरणी आठ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 11:32 IST2018-10-25T11:31:07+5:302018-10-25T11:32:30+5:30

साखरेची वाहतूक करणारा ट्रक अडवून दरोडा आणि चालकाचा खून केल्याप्रकरणी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Eight persons arrested in truck driver's murder, robbery case | ट्रक चालक खून, दरोडा प्रकरणी आठ जणांना अटक

ट्रक चालक खून, दरोडा प्रकरणी आठ जणांना अटक

सावंतवाडी : साखरेची वाहतूक करणारा ट्रक अडवून दरोडा आणि चालकाचा खून केल्याप्रकरणी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, या आरोपींनी पाचशे साखरेच्या पोत्यांची कुठे विल्हेवाट लावल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 
निपाणीजवळ लिप्टच्या बहाण्याने ट्रक अडवून हे सर्व आरोपी ट्रकमध्ये चढले होते. तसेच या चालकाचा खून करून ट्रकमधील साखरेची पोती लंपास करत ट्रक आंबोलीमध्ये सोडण्यात आला होता. यामुळे मोठी खळबळ माजली होती. 


या प्रकरणी कोल्हापूर आणि सावंतवाडी पोलिसांनी कारवाई करत आठ जणांना ताब्यात घेतले. सर्व आरोपींना मध्यरात्री सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याना दुपारी येथील न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Eight persons arrested in truck driver's murder, robbery case