Sindhudurg: तळाशील खाडीत आढळला 'बटू शुक्राणू व्हेल', महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील पहिलीच घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 11:58 IST2025-01-24T11:57:42+5:302025-01-24T11:58:05+5:30

स्थानिकांनी केले सुरक्षित रेस्क्यू 

Dwarf Sperm Whale found in Patinal Bay First incident on Maharashtra coast | Sindhudurg: तळाशील खाडीत आढळला 'बटू शुक्राणू व्हेल', महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील पहिलीच घटना

Sindhudurg: तळाशील खाडीत आढळला 'बटू शुक्राणू व्हेल', महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील पहिलीच घटना

संदीप बोडवे

मालवण : व्हेल जातकुळीतील ‘ड्वार्फ स्पर्म व्हेल’ ही अनोखी प्रजाती गुरुवारी मालवण येथील तळाशील खाडीत किनाऱ्याजवळ आढळून आली. या व्हेलला स्थानिकांनी सुरक्षितपणे रेस्क्यू करून खोल समुद्रात सोडून दिले आहे. जिवंत ड्वार्फ स्पर्म व्हेलला मच्छीमारांनी रेस्क्यू केल्याची महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील ही पहिलीच घटना मानली जात आहे.

तळाशील येथील काही मच्छीमारांना दुपारच्या सुमारास बोटिंग करत असताना खाडीकिनारी उथळ पाण्यात ड्वार्फ स्पर्म व्हेल आढळला. तत्काळ या व्हेलला रेस्क्यू करून सुरक्षितपणे तळाशीलजवळील खोल समुद्रात सोडून देण्यात आले. ही एक सिंधुदुर्गच्या सागरी जैवविविधतेमधील दुर्मिळ घटना मानली जात असल्याचे या विषयातील तज्ज्ञांनी सांगितले आहे.

मालवण किनारपट्टीवरील नोंदीला विशेष महत्त्व

बटू शुक्राणू व्हेल बहुतेक वेळा समुद्राच्या पृष्ठभागावर पडलेल्या स्थितीत आढळतात. यामुळे ते गटाने तरंगत असल्यासारखे दिसतात. हे व्हेल सहसा दोन ते सात सदस्यांच्या कळपाने दिसतात. यापूर्वी विशाखापट्टणम येथील त्रिवेंद्रममध्ये ड्वार्फ स्पर्म व्हेल जवळून जिवंत आढळल्याची नोंद आहे. त्यानंतर ही प्रजाती महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर पहिल्यांदाच जिवंत आढळून आल्याने मालवण किनारपट्टीवरील या नोंदीला विशेष महत्त्व आहे. - वर्धन पाटणकर, सागरी जीव शास्त्रज्ञ

Web Title: Dwarf Sperm Whale found in Patinal Bay First incident on Maharashtra coast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.