ट्रक दरीत कोसळून चालक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 17:54 IST2020-01-30T17:53:58+5:302020-01-30T17:54:53+5:30
आंबोली : चालकाचा ताबा सुटल्याने लाकूड वाहतूक करणारा ट्रक पंचवीस फूट खोल दरीत कोसळल्याची घटना आंबोली घाटात मंगळवारी रात्री ...

आंबोली येथे लाकूड वाहतूक करणारा ट्रक खोल दरीत कोसळला.
आंबोली : चालकाचा ताबा सुटल्याने लाकूड वाहतूक करणारा ट्रक पंचवीस फूट खोल दरीत कोसळल्याची घटना आंबोली घाटात मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या अपघातात चालक विजय माशेलकर (रा. झाराप, कुडाळ) हा जखमी झाला असून, त्याला गोवा-बांबोळी येथे दाखल करण्यात आले.
ही घटना आंबोली मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर घडली. चालक माशेलकर लाकूड वाहतुकीचा ट्रक घेऊन जात असताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक खोल दरीत कोसळला. या घटनेत माशेलकर गंभीर जखमी झाले. याबाबत ग्रामस्थांनी आंबोली पोलिसांना कळविल्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमी चालकाला बाहेर काढून अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविले. अधिक तपास आंबोली पोलीस करीत आहेत.