दुहेरी हत्याकाडाने सावंतवाडी हादरली; दोन वृद्ध महिलांची हत्या, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 10:43 IST2021-10-31T10:39:36+5:302021-10-31T10:43:32+5:30

धारदार हत्याराने अज्ञाताकडून दोन महिलांची हत्या; पोलीस घटनास्थळी

double murder in sawantwadi two elderly women killed | दुहेरी हत्याकाडाने सावंतवाडी हादरली; दोन वृद्ध महिलांची हत्या, परिसरात खळबळ

दुहेरी हत्याकाडाने सावंतवाडी हादरली; दोन वृद्ध महिलांची हत्या, परिसरात खळबळ

सावंतवाडी: सावंतवाडी शहर दुहेरी हत्याकांडाने हादरून गेले असून दोन वृद्ध महिलांचा शनिवारी मध्यरात्री अज्ञाताने धारदार हत्याराने खून केला असून ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे खून चोरीच्या उद्देशाने झाले आहेत असा प्राथमिक अंदाज आहे. या दोन्ही वृद्ध महिला सावंतवाडी शहरातील उभाबाजार परिसरात एका घरात राहत होत्या. निलिमा खानविलकर व शालिनी सावंत अशी या वृद्ध महिलांची नावे आहेत

हा खुनाचा प्रकार स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांच्यामुळे उघडकीस आला. ते रविवारी सकाळी या कुटुंबाला नेहमीप्रमाणे हाक मारण्यासाठी गेले असता या महिलांना कोणीतरी मारल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच ही घटना पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: double murder in sawantwadi two elderly women killed