उड्डाणपूल उभारल्याशिवाय वाहतूक सुरु करू नका - नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:59 PM2020-12-03T16:59:43+5:302020-12-03T17:02:28+5:30

kankavli, highway, sindhudurgnews केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून नवीन आराखड्याप्रमाणे चाळीस कोटी मंजूर करून घ्या. त्यासाठी लागणारी मदत आम्ही करू. मात्र, तोपर्यंत नव्या उड्डाणपूलावरुन वाहतूक सुरु करु देणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

Don't start traffic without building a flyover! | उड्डाणपूल उभारल्याशिवाय वाहतूक सुरु करू नका - नितेश राणे

कणकवली नगरपंचायत कार्यालयात गुरुवारी आयोजित महामार्ग काम आढावा बैठकीत आमदार नितेश राणे , समीर नलावडे आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देउड्डाणपूल उभारल्याशिवाय वाहतूक सुरु करू नका ! नितेश राणे यांची सूचना ; महामार्ग चौपदरीकरण काम आढावा बैठक

कणकवली: कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरण कामा दरम्यान उदभवलेल्या समस्या कार्यकारी अभियंता म्हणून तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन सोडवा. ज्याठिकाणी बॉक्सेल कोसळला आहे, त्या ठिकाणी वाय आकाराचे पिलर टाकून उड्डाणपूल उभारावे. त्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून नवीन आराखड्याप्रमाणे चाळीस कोटी मंजूर करून घ्या. त्यासाठी लागणारी मदत आम्ही करू. मात्र, तोपर्यंत नव्या उड्डाणपूलावरुन वाहतूक सुरु करु देणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

कणकवली येथील नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात गुरुवारी शहरात महामार्ग चौपदरीकरण काम करत असताना उदभवलेल्या समस्यांबाबत तसेच कामाच्या आढाव्याबाबत आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक झाली .

या बैठकीला नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, कार्यकारी अभियंता सलीम शेख ,दिलीप बिल्डकॉनचे प्रोजेक्ट मॅनेजर गौतम कुमार, परिहार, कन्सल्ट एजन्सी आरटी फॅक्टचे अधिकारी , नगरपंचायत बांधकाम सभापती मेघा गांगण , गटनेता संजय कामतेकर,आरोग्य सभापती अभिजित मुसळे , नगरसेवक शिशिर परुळेकर , किशोर राणे , बंडू गांगण , अशोक करंबेळकर , नितीन पटेल , संजय मालंडकर,महेश सावंत आदी उपस्थित होते.

शहरातील एस.एम.हायस्कूलसमोर कोसळलेल्या बोक्सेलच्या जागी वाय बिम उभारून उड्डाणपूल बांधण्यात यावा. केवळ तिथे प्लेट लावलात तर आम्ही खपवून घेणार नाही. तसेच काम देखील करु देणार नाही, असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कार्यकारी अभियंता शेख यांना सांगितले.

कणकवलीत उड्डाणपुल हे पिढ्यानपिढ्या टिकणारे हवे आहे. कोसळलेल्या उड्डाण पुलाच्या भागापासून गांगोमंदिरापर्यंत ११० मीटरचे उड्डाणपूल बांधण्यासाठी ४० कोटींचा निधी लागणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांनी प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी त्याला मंजुरी देतील.त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

या बैठकीत २६ जानेवारी पर्यंत उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू करण्याचे नियोजन असल्याचे के. गौतम यांनी सांगितले. त्यावेळी आमदार नितीश राणे यांच्यासह सर्वानीच त्याला विरोध केला. काम अपूर्ण असताना उड्डाणपूलावरून वाहतूक सुरू करू नका. जोपर्यंत कणकवली शहरातील नागरिकांचा प्रश्न मिटत नाही, तोपर्यंत वाहतूक सुरू होऊ देणार नाही असेही नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ठणकावले.

कणकवली शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन ४ ठिकाणी बदलून हव्यात आहेत.याबाबत महामार्ग अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले आहे.ते काम अद्याप का केले नाही. असे नगराध्यक्ष नलावडे यांनी विचारले. यावेळी ते काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता शेख यांनी दिले. पटवर्धन चौकात तीन आसनी रिक्षा स्टँड, बसस्थानकासमोर सहा आसनी रिक्षा स्टँड आवश्यक आहे. दुचाकी पार्किंगसाठीही जागा असावी,नगराध्यक्ष नलावडे यांनी सांगितले.

गटारे जिथे जिथे फुटली आहेत ती दुरुस्त करा. गटारालगत असलेले खुले चर बुजवा. शहरातील गांगोमंदिर आणि एस एम हायस्कुल समोरील अंडरपास जवळ गतिरोधक बनवा . त्या ठिकाणी आरसे लावून अपघात होऊ नये अशी उपाययोजना करा अशा सूचना नगरसेवक शिशीर परुळेकर यांच्या मागणीवर आमदार नितेश राणे यांनी दिल्या.

कणकवली शहरातील सर्विस रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्या ठिकाणी तातडीने डागडुजी करण्यात यावी. अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर दिलीप बिल्डकॉनकडून येत्या दोन दिवसात हे रस्ते करून देण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले.

हद्द निश्चिती तत्काळ करा !

भूसंपादन न झाल्यामुळे अप्पासाहेब पटवर्धन चौकात अद्याप आर ओ डब्ल्यू लाईन निश्चित करून हद्द निश्चिती झालेली नाही.ती तातडीने करावी.तसेच लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथील कामही लवकर करावे. अप्पासाहेब पटवर्धन चौक ते बसस्थानका दरम्यान सार्वजनिक शौचालय बांधून द्यावे. उड्डाणपुलाचे बांधकाम झालेल्या ठिकाणी बॅरिकेट्स लावावे . अशी मागणी नगराध्यक्ष नलावडे यांनी केली.
 

 

 

Web Title: Don't start traffic without building a flyover!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.